E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : ई-पीकपाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

Rabi Season : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीकपाहणी उपक्रम सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीकपाहणी उपक्रम सुरू आहे. पण यास रब्बीतही कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच अॅप सर्व्हर डाउनमुळे कार्यरत होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, ई-पीकपाहणीत अल्प पेरणी दिसत आहे.

ई-पीकपाहणी अॅण्ड्रॉइड मोबाइलच्या मदतीने ई-पीकपाहणी अॅपवरून करावी लागते. रब्बी हंगामातील पीक पेऱ्यांबाबत अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. परंतु ही नोंदणी करताना नेटवर्क, डाटा हवा असतो.

स्मार्ट फोन अनेकांकडे नाहीत. यामुळे पेरा नोंदणीस कमी प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड केले आहे. त्यांचा खाते क्रमांक व चार अंकी सांकेतांक आहे. हा खाते क्रमांक व सांकेतांकची नोंद केल्यानंतर अॅप सुरू होते.

पुढे पीकपाहणीसंबंधी कार्यवाही होते. परंतु अॅप सांकेतांक नोंदणी केल्यावरही कार्यरत होत नाही, अशाही तक्रारी आहेत. शेतकरी याबाबत तांत्रिक समस्या घेऊन तलाठी कार्यालयात जात आहेत. परंतु तलाठी याबाबत दुरुस्ती किंवा इतर कार्यवाहीबाबत असमर्थता दाखवीत आहेत. यासंबंधीची कार्यवाही प्रशासनातील संबंधित करू शकतात.

परंतु दुरुस्तीच होत नसल्याने पीकपाहणीची नोंद अॅपवर होत नसल्याची स्थिती आहे. रब्बी हंगाम निम्मा पूर्ण झाला आहे. आगाप उन्हाळ हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काहींनी पेरणी नोंदविली, परंतु पेरा नोंद अद्यापही उताऱ्यावर दिसत नाही, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रब्बीची पेरणी सुरू आहे, परंतु पेरणी ऑनलाइन दिसत नसल्याने काय उत्तरे द्यावीत, अशी स्थिती महसूल प्रशासनाची आहे. कृषी विभागाची मदत पेरणीसंबंधीच्या आकड्यांबाबत महसूल प्रशासनास घ्यावी लागत आहे. ई-पीकपाहणीसंबंधीचे काम महाआयटीच्या पुणे येथील कार्यालयातून हाताळले जाते. कुठेही ई-पीकपाहणीसंबंधी अधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT