Global Crop Production Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Production : कमी पावसाचा पीक उत्पादनाला फटका

Kharif Crop : उडीद, मूग ही पिके जूनमध्ये अल्प पाऊस झाल्याने हातची गेली. पुढे जुलै व सप्टेंबरमध्ये पाऊस झाला. परंतु ऑगस्टमध्ये पावसाचा खंड होता.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात अमळनेर, पाचोरा, भडगाव, पारोळा, धरणगाव, चाळीसगाव आदी तालुक्यांतील खरिपाची पिके जून व ऑगस्टमध्ये कमी पावसाने पावसाअभावी करपली. यामुळे उत्पादनात घट झाली असून, कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे कमी उत्पादन येत असल्याची स्थिती आहे.

उडीद, मूग ही पिके जूनमध्ये अल्प पाऊस झाल्याने हातची गेली. पुढे जुलै व सप्टेंबरमध्ये पाऊस झाला. परंतु ऑगस्टमध्ये पावसाचा खंड होता. अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबारातील शहादा, नंदुरबार, नवापूर या भागास मोठा फटका बसला आहे. मुरमाड, हलक्या क्षेत्रातील पिके पुरती हातची गेली.

चाळीसगावात ४९ हजार १६६ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात होती. सप्टेंबरमध्ये पाऊस आला, पण कापूस, मका, ज्वारी या पिकांच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. एकरी तीन ते चार क्विंटल ज्वारी, दोन क्विंटल मका, एक क्विंटल कापूस, असे उत्पादन येत आहे. अशीच स्थिती इतर तालुक्यांत किंवा गिरणा, बोरी पट्ट्यात आहे. काही शेतकऱ्यांना फक्त कमी उंचीचा, वाळलेला चारा हाती आला आहे.

जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर तसेच येणाऱ्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. बळीराजाला मदतही मिळालेली नाही. भरपाईबाबत त्याची अपेक्षा वाढली आहे. तालुक्यातील चाळीसगाव, शिरसगाव, तळेगाव महसूल मंडळांत अधिकचे नुकसान झाले आहे.

कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. या पिकांचा देखील सरसकट पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी होती, पण पीकविमा भरपाई मिळेल, असे लोकप्रतिनिधी म्हणाले व तेव्हा पंचनामे मागे पडले. पण पीकविमा परतावेही मिळालेले नाहीत.

चाळीसगाव, भडगाव, पाचोरा भागातील कमाल महसूल मंडलांत दुष्काळाचे विदारक चित्र ऑगस्टमध्येच होते. चाळीसगाव तालुक्यात खरीप क्षेत्राचे पेरणीयोग्य क्षेत्र ८७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यंदा ८६ हजार १५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

त्यातही ४९ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर जिरायत अर्थात कोरडवाहू तर ३६ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर बागायत पिकांची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा हा कापूस लागवडीचा आहे. त्या खालोखाल मका व इतर पिकांचा समावेश होतो. विहिरींच्या पाण्यामुळे बागायत क्षेत्रातील पिके तग धरून होती. परंतु कोरडवाहू क्षेत्रातील पिके मात्र फारशी हाती आलेली नसल्याने वित्तीय फटका बसला आहे.

ओलाव्याअभावी रब्बी संकटात

सप्टेंबरमध्ये जळगावच्या पश्चिम भागात पाऊस झाला, पण तोपर्यंत स्थिती बिकट बनली होती. पिकांना काहीही फायदा झाला नाही. आता रब्बीतही अपेक्षित पेरणी होत नसल्याची स्थिती आहे. कारण जमिनीत ओलावा नाही.

मुरमाड क्षेत्रात पिकवाढीची क्षमता नाही. त्यामुळे रब्बीबाबतही सकारात्मच चित्र चाळीसगाव, पारोळा, भडगाव, शिंदखेडा, साक्री, धुळे, नंदुरबार, नवापूर, शहादा भागात नाही, असेही सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT