Tur Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Production: कमी खर्चाचे, सोपे तंत्र वाढविते तुरीचे उत्पादन

Scientific Farming: महाराष्ट्रात तूर पीक दुय्यम समजले जाते, विशेषतः सोयाबीनसोबत घेतले जाते. मात्र काही शास्त्रीय फेरबदल व तुरीला अधिक महत्त्व दिल्यास उत्पन्न व उत्पादनक्षमतेत मोठी वाढ साधता येऊ शकते.

जितेंद्र दुर्गे

Farming Tips: सोयाबीन आणि तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये तुरीकडे तुलनेने दुर्लक्ष होते. त्याची योग्य अंतरावर पेरणी, विरळणी, छाटणी यांसह अनेक कामे वेळच्या वेळी होत नाहीत. त्यातून उत्पादनामध्ये आणि एकूण उत्पन्नामध्ये घट येते. हे लक्षात घेता कमीत कमी खर्चामध्ये या पिकांचे नियोजन केल्यास फायदा नक्कीच वाढू शकेल.

सलग तूर पीक घेण्याचे प्रमाण फारच अल्प आहे. सामान्यतः सोयाबीन : तूर हे आंतरपीक घेतले जाते. त्यात सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक (साधारणत: १०० दिवस ) आहे, तर तूर पीक ७ ते ८ महिने शेतात उभे असते. पुढील काळामध्ये तूर पिकाकडे दुर्लक्ष होते. या पिकांची लागवडही सोयाबीनच्या ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने केली जाते. त्यामुळे सोयाबीनच्या दोन झाडांतील अंतर ५ सेंमी राखले जाते. त्याच वेळी तुरीचे बियाणेही याच अंतरावर पडते. खरेतर तुरीसाठी ते अंतर कमीत कमी १५ ते २० सेंमी असावयास हवे.

यावर उपाय -

१. खुरपणी करते वेळी तूर पिकाची विरळणी करणे गरजेचे असते. किंवा

२. पेरणीयंत्राच्या कप्प्यात तूर बियाण्यांसोबत १:१ प्रमाणात थोडी जाडसर रेती भरावी. त्यामुळे तूर बियाण्यातील अंतर वाढण्यास मदत होईल अथवा

३. पेरणीचे वेळी तूर बियाणे (एकरी २.५ ते ३.० किलो) कमी वापरावे.

या समस्या कमी करण्यासाठी तूर पिकाला मुख्य पिकाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी पुढील उपाय करता येतील.

उपाय १ : सामान्यतः सोयाबीन : तूर यांची ६ः१ पद्धतीमध्ये पेरणी केली जाते. त्यात सोयाबीन पीक दाटल्यामुळे तेवढ्या उंचीपर्यंत तुरीच्या खालील फांद्या वाळतात, सुकतात. त्यातील सोयाबीनच्या तुरीजवळच्या एकेक ओळ कमी करता आल्यास तूर पिकाला फायदा होऊ शकेल. त्यासाठी पेरणीयंत्रातील सोयाबीनच्या बियाणे टप्प्यातील अलीकडची तिसरी व पलीकडची तिसरी नळी टिकली लावून बंद केल्यास हे साधता येईल. यामुळे ४ ओळी सोयाबीन - खाली ओळ - तुरीची १ ओळ - खाली ओळ - पुन्हा ४ ओळी सोयाबीन अशी पेरणी शेतात होईल.

अथवा

उपाय २ : ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्राच्या दात्यांमध्ये (फण्यांमध्ये) थोडा फेरबदल करता येईल. त्यासाठी मधले चार नंबरचे दाते (फणे) तसेच ठेवून पेरणीयंत्राचे अलीकडील तीन दाते व पलीकडचे तीन दाते यामधील अंतर कमी करून घ्यावे.

या दोन्ही उपायांमध्ये या खाली ओळीच्या जागी डवरणी (कोळपणी) वेळी जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात. त्यामुळे तुरीची एक ओळ वरंबावर येईल व सोयाबीनच्या चार ओळी गादीवाफ्यावर येतील.

जितेंद्र दुर्गे ९४०३००६०६७

(लेखक श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत

Tuti Cultivation: सांगली जिल्ह्यात ‘महारेशीम’ची ९७ एकरांवर तुती लागवड

Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम 

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

SCROLL FOR NEXT