Jute Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Jute Production : अल्प खर्चाच्या ताग उत्पादनाकडे ओढा

Jute Cultivation : पीक कोवळे असताना गुरांना चारा आणि बियाणे तयार झाल्यावर साधारणतः ४० ते ४५ किलो दराने गुजरातमधील व्यापारी खरेदी करतात.

Team Agrowon

Palghar News : मनोर पट्ट्यातील गावांमध्ये सुमारे ७० ते ८० हेक्टर क्षेत्रावर ताग लागवड होते आहे. पीक कोवळे असताना गुरांना चारा आणि बियाणे तयार झाल्यावर साधारणतः ४० ते ४५ किलो दराने गुजरातमधील व्यापारी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळत आहे.

पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागासह वाडा, विक्रमगड, जव्हार आणि डहाणू तालुक्यातील पोखरण, बाडापोखरण, वासगाव या भागांमधील शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या ताग लागवडीकडे वळला आहे.

सध्या हे पीक फुलोऱ्यात आले असून पिवळ्याधमक फुलांनी शेतात सोने उगवल्यासारखे भासत आहे. ताग हे जरी हिरवळीचे खत म्हणून प्रसिद्ध असले तरी येथील शेतकरी हे तागाच्या बियांची विक्री करून उत्पन्न घेत आहेत.

घरचेच बियाणे वापरत असल्याने कोणताही खर्च होत नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरदरम्यान लागवड केली जाते. भात पेरणीप्रमाणे तागाच्या बियाण्यांची पेरणी केली जाते. ताग पेरल्यानंतर वरून ट्रॅक्टर फिरवला जातो, त्यामुळे जमिनीमध्ये बियाणे व्यवस्थित मातीने झाकले जाते. बारा ते पंधरा दिवसांत जमिनीतील ओलाव्यावर ताग उगवून येतो.

थंडीच्या दिवसात दव पडत असल्याने जमिनीमध्ये आर्द्रता असते. त्यामुळे तागाच्या पिकाला सिंचनाची सुविधा लागत नाही. कीड व रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने ताग लागवडही कमी खर्चात केली जात आहे.

वाल, मूग पिकांप्रमाणे तागाच्या बियाणाची पेरणी होते. खत, पाण्याचीही आवश्यकता भासत नाही. तागाच्या बियांपासून तेल तयार केले जाते. गुजरातमधील व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी येऊन बी खरेदी करत असल्याने बाजारपेठ शोधण्याची गरज भासत नाही.

त्यामुळे बियाण्यांची विक्री ही स्थानिक पातळीवर होत असल्याने रब्बी हंगामात ताग लागवड होते. ताग शेतीतून प्रतिएकर पाच ते सहा क्विंटल उत्पादन (बी) मिळते. या बियांना चार ते पाच हजार प्रति क्विंटल दर मिळतो. कमी खर्चाचे व प्रतिएकरी हमखास उत्पादन देणारे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.

ताग हे पीक नत्राची गरज स्वतः भागवत असल्याने बाहेरून नत्र देण्याची गरज भासत नाही. कमी कालावधीत जलद वाढ आणि भरपूर पाला देणारे पीक असल्याने वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात आहे.

तागाची लागवड पावसाळ्यात सेंद्रिय हिरवळीचे खत आणि रब्बी, तसेच उन्हाळी हंगामात बियांची विक्री या दुहेरी दृष्टिकोनातून केली जाते. परंतु बियांच्या विक्रीसाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी तागाची लागवड करत आहेत.
- डॉ. भरत कुशारे, ऍग्रोनॉमिस्ट, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू
पावसाळ्यानंतर सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने ताग लागवड फायदेशीर ठरते. मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर एवढाच खर्च आहे. व्यापारी घरी येऊन तागाचे बी खरेदी करत असल्याने विक्रीची अडचण दूर झाली आहे.
- अरुण भोईर, ताग उत्पादक शेतकरी, खामलोली, पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Loss: नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी भुईसपाट

Fuel Stock Solapur: इंधनाचा मुबलक साठा; पुरवठा सुरळीत ठेवा: जिल्हाधिकारी

Urea Import: खरिपासाठी १७ लाख टन युरिया खरेदीची तयारी, नॅशनल फर्टिलायझर्सने काढली निविदा

Parbhani Crop Loan: परभणी जिल्ह्यात खरीप पीककर्जाचे २.३३ टक्के उद्दिष्ट साध्य

Udid Seeds: अक्कलकोटमध्ये उडदाचे साडेआठ लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त

SCROLL FOR NEXT