Moong Market Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Rate : मंठा बाजारपेठेत मुगाची अत्यल्प आवक

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात यंदा पावसाअभावी खरिपाच्या पेरणीस उशीर झाल्याने शेतकऱ्यांनी मुगाऐवजी कपाशी व सोयाबीन पीक क्षेत्रात वाढ केली आहे. त्यामुळे मूग उत्पन्नात घट झाल्याने बाजारपेठेत अत्यल्प आवक आहे.

दरम्यान, वन्यप्राण्यांचा त्रास, काढणीच्या वेळी अतिवृष्टी, भाव कमी या व इतर कारणांनी शेतकऱ्यांनी मुगाकडे पाठ फिरविली आहे. पूर्वी प्रत्येक शेतकरी पाच-दहा एकर क्षेत्रात मुगाची पेरणी करीत होता.

आता मात्र काही गुंठ्यांवर मुगाची पेरणी होत आहे. मंठा बाजारपेठेत तसेच तालुक्यातील नळडोह, दुधा, पांगरी गोसावी, नायगाव या आठवडी बाजारात शेतकरी नवा मूग विक्रीकरिता आणीत आहेत.

दहा एकर शेती असून दरवर्षी तीन ते चार एकर मुगाचे पीक घेतो. परंतु, नैसर्गिक आपत्तीबरोबरच रोही, रानडुक्कर, हरीण हे वन्यप्राणी पिकाचे नुकसान करतात. त्यामुळे यावर्षी घरच्यापुरते मूग होतील. या दृष्टीने थोड्या क्षेत्रात मुगाची पेरणी केली होती. मुगाचे पीक देखील चांगले आले होते. परंतु, अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झाले आहे.
- रमेशराव वायाळ, मुरूमखेडा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

Wheat Sowing : खानदेशात गव्हाची २४ हजार हेक्टरवर पेरणी शक्य

ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

Agriculture Awards Ceremony : महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

Krishi Sahayyak : कृषी सहायकांच्या समस्यांवर पुण्यातील बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT