Crop Spray Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme : फवारणीपंप कमी, अर्जदार अधिक असल्याने लॉटरी काढणार

Crop Spray Pump : शेतकऱ्यांना अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या बॅटरीचलीत फवारणी पंपासाठी लक्ष्यांकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

Team Agrowon

Amaravati News : शेतकऱ्यांना अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या बॅटरीचलीत फवारणी पंपासाठी लक्ष्यांकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ हजार ९४२ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

त्यातील १४ हजार ३३० शेतकऱ्यांना पंप वितरित करण्यात येणार असून त्यांची लॅाटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. एकात्मिक सोयाबीन, कापूस व तेलबिया उत्पादन वाढ व मूल्यसाखळी विकास या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत बॅटरी चलीत फवारणीपंप शंभर टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहेत.

त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याची मुदत १४ ऑगस्ट होती. या कालावधीत लाडकी बहीण योजनेमुळे पोर्टलवरील भार वाढल्याने ते संथ होते. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे २६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

त्यानंतर जिल्ह्यातून या पोर्टलवर १७ हजार ९४२ अर्ज दाखल झाले. सर्वाधिक अर्ज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून २ हजार ३३७ दाखल झाले आहेत.अमरावती जिल्ह्यासाठी १४ हजार ३३० पंप वितरणाचे लक्ष्यांक आहे.

लॅाटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी ३ हजार ६१२ शेतकऱ्यांचे अर्ज बाद होणार आहेत. शंभर टक्के अनुदानावर या पंपांचे वितरण करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय अर्ज

अचलपूर ः १११७, अमरावती ः ११३२, अंजनगावसुर्जी ः ११३७, भातकुली ः १४४७, चांदूररेल्वे ः ११४७, चांदूर बाजार ः १५६३, चिखलदार ः १७०, दर्यापूर ः ११२८, धामणगावरेल्वे ः १४३३, धारणी ः ४६१, मोर्शी ः २०२८, नांदगाव खंडेश्वर ः २२३७, तिवसा ः १५४४, वरूड ः १३९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT