Spray Pump Scheme : बॅटरीचलित फवारणी पंपासाठी अर्जाची मुदत उद्यापर्यंत वाढवली

Agriculture Scheme : महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करणेकरीता आता २६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
Pesticide
Pesticide Agrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपसाठी अर्ज करणे करीता २६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२०२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

Pesticide
Agriculture Schemes : शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना ; जाणून घ्या

सन २०२४-२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सोयाबीन या पिकाकरीता सदर योजना लक्षांक प्राप्त आहे. मागील खरीप हंगामातील सोयाबीन पेरणी क्षेत्रानुसर जिल्हयातील तालुका उत्तर सोलापुर, दक्षिण सोलापुर, अक्कलकोट, मोहोळ, व बार्शी तालुक्यांना लक्षांक वितरीत करण्यात आलेला असुन, फक्त याच तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हि योजना लागु आहे.

Pesticide
Agriculture and Food Processing Scheme : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद

इथे करा संपर्क

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करणेकरीता आता २६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कृषि यांत्रीकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.

तरी जास्तीत जास्ततरी शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट ऑनलाईन अर्ज करावेत आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com