Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : ‘अवकाळी’मुळे गहू, ज्वारी पिके मातीमोल

पेरू, टरबूज, खरबूज, टोमॅटोसह पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुगीच्या कामात अडथळे येत आहेत.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडलात शुक्रवारी (ता. 17) सकाळी आठ पर्यंतच्या 24 तासांत वादळी वारे (Stormy winds), विजांच्या कडकडात हलका ते मध्यम पाऊस झाला.

गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसात ज्वारी (Jowar), गहू (Wheat), हरभरा (Chana), कापूस (Cotton) आदी पिके भिजल्याने मालाच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

हाती आलेली पिके माती मोल होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. उखळी (ता. सोनपेठ) येथील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात गुरुवारी (ता. 16) दुपारी तसेच रात्री हलका ते मध्यम पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आदी तालुक्यातील अनेक मंडलात हलका पाऊस झाला. या दोन जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाऱ्यामुळे ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले आहे.

ज्वारीच्या कणसात माती गेल्यामुळे दाणे काळे पडले आहेत. कडब्याची प्रत खराब झाली आहे. गव्हाच्या ओंब्या भिजल्यामुळे दाण्याचा रंग उडाला आहे. केळीचे पाने फाटून झिरमाळ्या झाल्या आहेत. आंब्याच्या कैऱ्या, संत्रा गळून पडले आहे.

पेरू, टरबूज, खरबूज, टोमॅटोसह पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुगीच्या कामात अडथळे येत आहेत. कापणी, मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

एका महिलेचा वीज पडून मृत्यू...

जिल्ह्यातील उखळी बुद्रूक (ता. सोनपेठ) शिवारात गुरुवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता झालेल्या अवकाळी पावसामध्ये वीज कोसळल्यामुळे शेतात ज्वारी काढण्याचे काम करत असलेल्या नीता गणेश सावंत आणि शीला विष्णू सावंत या गंभीर जखमी झाल्या.

त्यांना तत्काळ परळी वैजनाथ येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी नीता सावंत (वय ३५ वर्षे) यांना मृत घोषित केले तर शीला सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT