Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Crop Loss : दहा शेतकऱ्यांच्या टोमॅटो लागवडीचे नुकसान

Tomato Crop Damage : मुखेड (ता. निफाड) येथे शनिवारी (ता. २८) मध्यरात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने दहा शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या टोमॅटोच्या पिकांवर विळा, कोयत्याने वार करून पिकांची नासधूस केली.

Team Agrowon

Niphad News : बहुप्रतीक्षेनंतर टोमॅटोला ८०० रुपये प्रतिक्रेट दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण होते. पण टोमॅटोला मिळणारा दर काही अपप्रवृत्तीच्या डोळ्यात खुपतोय. मुखेड (ता. निफाड) येथे शनिवारी (ता. २८) मध्यरात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने दहा शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या टोमॅटोच्या पिकांवर विळा, कोयत्याने वार करून पिकांची नासधूस केली. मिळत असलेला टोमॅटोचा भाव व झालेला खर्च पाहता तीन लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झालेले आहे. माथेफिरूच्या या कृत्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीमालाची रात्रीच्या वेळी राखण करण्याची वेळ आली आहे.

तीन वर्षांनंतर टोमॅटो उत्पादकांना सरासरी ८०० रुपये क्रेट असा दर मिळतो आहे. टोमॅटोच्या मिळणाऱ्या दराला विकृत मनोवृत्तीची दृष्ट लागली आहे. मुखेड (ता. निफाड) येथील शेतकरी निर्यातक्षम टोमॅटो उत्पादनात आघाडीवर असतात. त्यासाठी अधिकचा खर्च करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात मुखेड परिसरात टोमॅटोची लागवड झाली आहे. सध्या काढणी सुरू असून दरात सुधारणा असल्याने कष्टाचे चीज झाल्याची भावना आहे.

पण शनिवारची मध्यरात्र मुखेडच्या दहा शेतकऱ्यांसाठी पिकासाठी वैरी ठरली. एक माथेफिरूने मुखेडच्या पिंपळगाव रस्त्यावरील एमआयडीसीलगत विळा किवा कोयत्यासारखे धारधार हत्यार घेऊन परिसरातील दहा शेतकऱ्यांच्या शेतातील दोन गल्ल्यांमधील टोमॅटोच्या पिकांवर वार केले. तब्बल वीस गल्ल्यांमध्ये त्या माथेफिरूने धुडगूस घातला. शेतात टोमॅटो विखुरले होते. तर काही झाडे उखडून टाकली. परशुराम पवार यांच्या भोपळ्याच्या पिकाची नासाडी केली.

सकाळी संबंधित शेतकरी शेतात टोमॅटोची काढणी करण्यासाठी आले असताना हा प्रकार लक्षात आला. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु अनावर झाले. मल्चिंग पेपर, खते, बियाण्यांचा खर्च, तीन महिने कीटकनाशक फवारणी यासह काबाडकष्ट करून फुलविलेले टोमॅटोच्या पिकाची नासाडी झाली. एकूण तीन लाख रुपयांहून अधिक आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसली.

नुकसान झालेले शेतकरी

देवदत्त भास्कर शेळके, दत्तात्रय राजाराम पवार, शरद पोपटराव शेळके, परसराम राजाराम पवार, शरद श्रीराम शेळके, बाळासाहेब निवृत्ती पवार, निखिल विश्‍वनाथ जाधव, नामदेव कारभारी शेळके, कैलास संपतराव सताळे, प्रतापराव महादू पवार या शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे माथेफिरूकडून नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT