Nandurbar News : शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील काकर्दे खुर्द, काकर्दे दिगर, हिंगणी, तोरखेडा, अभाणपूर, कोंढावळ, खापरखेडा (ता. शहादा) परिसरास ३० नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह सोसाट्याचा वारा तसेच ढगफुटीसदृश मुसळधार अवकाळी पावसासोबत जोरदार वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकरातील फळबागांचे नुकसान झाले होते. यातील नुकसानग्रस्तांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
केळी, पपई, हरभरा, टोमॅटो, डांगरमळ्यांचे मोठे नुकसान झाले. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले. महसूल व कृषी विभागाने परिसरातील शेत शिवारात नुकसानीचे पंचनामे केले होते.
शहादा तालुक्यातील काकर्दे दिगर, काकर्दे खुर्द, हिंगणी, तोरखेडा, अभणपूर, खापरखेडा, कोंढावळ परिसरात आठवड्यात दुसऱ्यांदा सुमारे अर्धा तास पाऊस झाला होता. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकरातील फळबागा केळी, पपई अक्षरशः आडवी पडली असून, लागलेली फळे जमिनीवर पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
काकर्दे खुर्द, दिगर शिवारातढगफुटीसदृश पावसाने, सोसाट्याच्या वाऱ्यासह रौद्ररूप धारण केले होते. पावसासह वाऱ्याच्या तडाख्याने केळी, पपई या पिकांचे झाड पूर्णतः आडवी पडली होती. यामुळे शेतात फळांचे खच पडले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.