Siddheshwar Water Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘सिद्धेश्वर’च्या पाणी आवर्तनास उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Rabi Season : यंदाच्या दुष्काळी स्थितीत पाणी आवर्तन सोडण्यास उशीर झाल्यामुळे रब्बीची पेरणी करता आला नाही. खरीप पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्याबद्दल भरपाई द्यावी. तत्काळ पाणी आर्वतन सुरू करावे.

Team Agrowon

Parbhani News : पूर्णा नदीवरील येलदरी धरणात ५७ टक्के व सिद्धेश्‍वर धरणात ९२ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीत पाणी आवर्तन सोडण्यास उशीर झाल्यामुळे रब्बीची पेरणी करता आला नाही. खरीप पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्याबद्दल भरपाई द्यावी. तत्काळ पाणी आर्वतन सुरू करावे, अशी मागणी गुरुवारी (ता. २३) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत शेतकरी तसेच विविध पक्षांतर्फे करण्यात आली.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार फौजियाखान, जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विजय गव्हाणे, किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर, रितेश काळे, निळकंठ जोगदंड आदीसह शेतकरी प्रतिनिधींनी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, की मराठवाड्यातील सर्वांत जुन्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पात येलदरी-सिद्धेश्‍वर धरणात येलदरी ५७ टक्के व त्याखालील सिद्धेश्‍वर धरणात ९२ टक्के पाणीसाठा आहे.

सिद्धेश्‍वर धरणाच्या कालव्याचे ५७ हजार हेक्टर लाभक्षेत्र परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांत आहे. दुष्काळग्रस्त स्थिती असतांना रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पाणी आवर्तने सोडण्यात आली नाहीत. पाणी आवर्तने सोडण्याबाबत कोणत्याही प्रकारचे निजोयन करण्यात आलेले नाही.

त्यास मुख्य कारण म्हणजे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीची बैठकच आजतागायत घेण्यात आलेली नाही. परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी बैठकीसाठी वेळ दिला नसल्याने पाणी पाण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही, अशी धक्कादायक माहिती पाटबंधारे प्रशासनाने परभणी जिल्हाधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केली.

यावर क्षीरसागर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याची अवहेलना सत्ताधारी मंत्र्यांनी चालवलेली आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ परभणी येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पूर्णा पाटबंधारे प्रशासनाने शनिवार (ता. २५) पासून तत्काळ पाणी आवर्तन सुरू करावे, असे आदेश दिले.

किसान सभेने पालकमंत्र्यांचा तीव्र धिक्कार केला असून, शासन निर्णय पालकमंत्री स्वतःच मोडीत काढत असल्याचा आरोप केला आहे. पुतना मावशीचा रोल पालकमंत्री बजावत आहेत का, असा सवाल केला क्षीरसागर यांनी केला. गव्हाणे म्हणाले, की सिद्धेश्‍वरमधून पाणी आवर्तन सोडण्यास उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणी करता आली नाही. पाण्याअभावी उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी. पाच पाणी आवर्तने सोडावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT