Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Wilt Disease : ‘आकस्मिक मर’ समस्येमुळे कापूस पिकाचे नुकसान

Cotton Disease : कडक ऊन आणि त्यानंतर जोरदार पाऊस पडल्याने नगर जिल्ह्यात कापसाच्या पिकांवर ‘आकस्मिक मर’ची समस्या तयार झाली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : कडक ऊन आणि त्यानंतर जोरदार पाऊस पडल्याने नगर जिल्ह्यात कापसाच्या पिकांवर ‘आकस्मिक मर’ची समस्या तयार झाली आहे. साधारण दहा दिवसांपूर्वी काही भागांत हा प्रादुर्भाव सुरू झाला.

कृषी विद्यापीठांनी सुचवलेल्या उपाययोजनेनंतर हा प्रादुर्भाव थांबला होता. मात्र पुन्हा कडक ऊन आणि त्यानंतर अचानक होत असल्याने पावसाने चार दिवसांपासून नगरसह मराठवाडा, विदर्भातील काही भागांत कापसावर पुन्हा ही समस्या दिसून येत आहे.

यामध्ये झाडे जागेवर कोमेजून जात आहेत. कोमेजलेल्या झाडांत सुधारणा होत नसल्याने कापूस उत्पादक हतबल झाले आहेत. अगदी बहरात असलेले पीकही एका दिवसात कोमेजत असून आतापर्यंत साधारण पाच ते दहा टक्के क्षेत्रांवर या समस्येचा परिणाम झाला आहे.

राज्यात कापसाचे ४२ लाख १ हजार १२८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा आतापर्यंत ४० लाख ७३ हजार ६६१ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र असते. त्यापाठोपाठ नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत कापूस उत्पादनाला प्राधान्य दिले जाते.

यंदा लवकर झालेल्या पावसाने कापसाची लवकर लागवड झाली. मात्र त्यानंतर काही दिवसापासून नगर, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत पाऊस नव्हता. उन्हाचा चटका अधिक वाढलेला असताना मागील दहा ते बारा दिवसांपूर्वी अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

त्यानंतर अनेक ठिकाणी कपाशीवर ‘आकस्मिक मर’ झाल्याचे मिळाले. त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू राहिल्याने तसेच कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उपाययोजना सूचवल्यावर हा प्रकार थांबला होता. मात्र चार दिवसांपासून जोरदार पाऊस झालेल्या काही भागांत पुन्हा ही समस्या दिसू लागली आहे. अचानक होत असलेल्या या प्रकाराने कापूस उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.

काही दिवस पाऊस नसल्याने आणि उन्हाचा चटका पडलेला असतो. अचानक पाऊस झाला तर कपाशीच्या झाडाला उष्माघातासारखा शॉक बसतो आणि त्या झाडाच्या मुळाचा जमिनीशी संपर्क तुटून झाड लगेच कोमेजून जाते. अनेक भागात हा ‘आकस्मिक मर’ हा प्रकार घडला आहे. मध्यंतरी तो थांबला होता. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा शेतकरी समस्येबाबत सांगत आहेत. वेळीच मार्गदर्शन घेऊन उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येऊ शकेल.
डॉ. दिगांबर पटाईत, सहायक कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT