Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : गुलाबी बोंड अळीमुळे १५० लाख गाठींचे नुकसान

Pink Bollworm : गुलाबी बोंड अळीसह नैसर्गिक समस्यांमुळे देशातील कापूस पिकाची अतोनात हानी झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : गुलाबी बोंड अळीसह नैसर्गिक समस्यांमुळे देशातील कापूस पिकाची अतोनात हानी झाली आहे. याचा थेट फटका कापूस उत्पादकांना बसला असून, दर्जेदार किंवा प्रतिकारक्षम कापूस वाणांचा मुद्दा वस्त्रोद्योगात पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कापूस उत्पादनात गुलाबी बोंड अळीने सतत घट येत आहे. परिणामी, भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कापूस उत्पादनात यंदाही पुन्हा एकदा चीनने जगात आघाडी घेतली आहे.

भारतात जगात सर्वाधिक १२६ ते १२९ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. चीनमधील लागवड ३३ लाख हेक्टरवर असते. अमेरिकेतील लागवड ३८ ते ४१ लाख हेक्टरवर असते. ब्राझीलमधील लागवड १२ ते १४ लाख हेक्टरवर असते.

परंतु गुलाबी बोंड अळीच्या समस्येने आता भारतात पूर्वहंगामी किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या कापसाखालील क्षेत्रातही अल्प उत्पादन येत आहे. हे उत्पादन महाराष्ट्रातील काही भागात एकरी चार क्विंटल, तर काही भागांत एकरी अडीच ते तीन क्विंटल एवढेच आहे.

कोरडवाहू क्षेत्रात तर एकरी ८० किलो ते एक क्विंटल कापूस उत्पादनही जेमतेम हाती आले आहे. चीनची कापूस उत्पादकता १२०० किलो रुई प्रतिहेक्टरी एवढी कायम आहे. परंतु भारताची कापूस उत्पादकता ५०० किलो रुई प्रतिहेक्टरीवरून ३५२ किलो रुई प्रतिहेक्टरी एवढी खाली आली आहे. २०२८ ते २०११ या कालावधीत भारतातील कापूस उत्पादकता ४०० ते ५०० किलो रुई प्रतिहेक्टरी एवढी होती. परंतु दुष्काळ, नैसर्गिक समस्या वाढल्या. त्यात मागील सात वर्षे गुलाबी बोंड अळी कापूस पिकाची पाठ सोडायला तयार नाही.

देशातील कापसाचे उत्पादन व उत्पादकता कमी, अशी स्थिती कायम आहे. देशातील वस्त्रोद्योगाची गरज ३१० ते ३०० लाख गाठी एवढी असते. परंतु देशातील उत्पादन आता २९५ लाख गाठींपर्यंतच मर्यादित राहील, असे दिसत आहे. अर्थात देशातील कापसाची पूर्ण करणेही अशक्य होत आहे. कापूस निर्यातदार असलेला भारत कापूस आयातदार बनू शकतो, अशीही भीती वस्त्रोद्योगातील जाणकार व्यक्त करीत आहे.

यंदाचा फटकाही मोठा

देशातील कापूस लागवडीनुसार उत्पादन किमान ४५० ते ५०० लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढे यायला हवे. जगात ऑस्ट्रेलियाची कापूस उत्पादकता सर्वाधिक १८०० किलो रुई प्रतिहेक्टरी आहे. त्यापाठोपाठ चीन, ब्राझील, अमेरिकेची उत्पादकता आहे. चीनमध्ये यंदाचे उत्पादन ३४९ लाख गाठी एवढे आल्याची माहिती आहे. तर अमेरिकेतील उत्पादनही २२७ लाख गाठींपुढे आहे.

या देशांचे कापसाखालील क्षेत्र अल्प आहे. परंतु चांगले किंवा उत्पादनक्षम कापूस वाण देशात नाहीत, अशी ओरड देशातील वस्त्रोद्योगात वाढली आहे. उत्पादन अधिक आल्यास कमी दरांचा मुद्दा फारसा पुढे येत नाही.

परंतु उत्पादन एवढे कमी आहे, की त्यात खर्चही निघत नाही. देशात यंदा किमान १५० लाख कापूसगाठींचे उत्पादन गुलाबी बोंड अळी व अन्य समस्यांनी कमी येईल. यात देशाचे किमान २५ हजार कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे, असे जाणकारांचे मत आहे.

देशातील घटते कापूस उत्पादन (लाख गाठींमध्ये, एक गाठ १७० किलो रुई)

वर्ष---उत्पादन

२०२१-२२---३४२

२०२२-२३---३१०

२०२३-२४---२९५ ते ३०० (अपेक्षित)

कोरडवाहू क्षेत्रामुळेही अडचण

देशात कापसाखालील ६० टक्क्यांवर क्षेत्र कोरडवाहू आहे. महाराष्ट्रात तर ७४ टक्क्यांपर्यंत कापसाखालील क्षेत्र कोरडवाहू असते. राज्यात सर्वाधिक ४४ लाख हेक्टरवर कापूस पीक असते. यापाठोपाठ गुजरातेत २४ ते २५ लाख हेक्टरवर कापूस असतो. गुजरातेत ५५ टक्के कापसाखालील क्षेत्राला पाणी उपलब्ध असते.

तेलंगणातही १८ लाख हेक्टरवर कापूस असतो. तेथेही कमाल क्षेत्र कोरडवाहू आहे. जेथे कापूस पीक अधिक आहे, तेथे गुलाबी बोंड अळी आहे, यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. या स्थितीत कापूस वाणांसंबंधीच्या जनुकीय सुधारित तंत्रज्ञानावर गतीने देशात काम होण्याची गरज असल्याचा मुद्दा वस्त्रोद्योगात उपस्थित केला जात आहे.

गुलाबी बोंड अळीमुळे देशात यंदा सुमारे १५० लाख कापूसगाठींचे उत्पादन कमी आले आहे. कापूस उत्पादनाला मोठा फटका सहा, सात वर्षे बसत आहे. ब्राझीलमध्ये कापूस वाणांमधील बोलगार्ड ७ तंत्रज्ञान आले आहे. अन्य कापूस उत्पादक देशांत दर्जेदार कापूस वाणांसाठी सतत संशोधन केले जाते. आपल्याकडेही उत्पादनक्षम, गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक्षम कापूस वाण तातडीने यायला हवा.
- अरविंद जैन, उपाध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT