NABARD Loan Rumours Agrowon
ॲग्रो विशेष

NABARD Loan Rumours : ‘दुग्ध विकास’साठी शेतकऱ्यांना ‘नाबार्ड’कडून कर्ज ही अफवा

Milk Development Loan Update : ‘नाबार्ड’च्या वतीने दुग्ध उद्योजकता विकास योजनेअंतर्गत नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना थेट कर्ज देत असल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरवल्या जात आहेत.

Team Agrowon

Mumbai News : ‘नाबार्ड’च्या वतीने दुग्ध उद्योजकता विकास योजनेअंतर्गत नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना थेट कर्ज देत असल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरवल्या जात आहेत. मात्र त्यात तथ्य नसून अशी माहिती पूर्णतः चुकीची असल्याचे ‘नाबार्ड’ने स्पष्ट केले आहे.

‘नाबार्ड’च्या वतीने दुग्ध व्यवसायासाठी थेट शेतकऱ्यांना कर्ज आणि अनुदान देण्यात येत असल्याच्या बातम्या काही डिजिटल मीडियावर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

‘नाबार्ड डेअरी लोन योजना २०२४’ या नावाने याची प्रसिद्धी केली जात होती. डेअरी फार्म सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बजेट तयार केले असल्याचेही सांगणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्याबाबतचे यू-ट्यूब व्हिडिओही प्रसिद्ध झाले होते.

‘नाबार्ड डेअरी लोन योजना २०२४’ या नावाने याची प्रसिद्धी केली जात होती. डेअरी फार्म सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बजेट तयार केले असल्याचेही सांगणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्याबाबतचे यू-ट्यूब व्हिडिओही प्रसिद्ध झाले होते.

सर्वोच्च विकास वित्त संस्था असलेली नाबार्ड ग्रामीण विकासाशी संलग्न असलेल्या विविध वित्तीय संस्था, सहकारी संस्थांना आर्थिकसाह्य आणि पाठबळ देण्याचे कार्य करते. ‘नाबार्ड’ शेतकऱ्यांना कधीही थेट कर्ज वितरित करत नाही.

सर्व भागधारकांना, विशेषतः: शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांनी अशा चुकीच्या माहितीबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी. तसेच अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यापासून किंवा प्रचार करण्यापासून दूर राहावे, असे आवाहन ‘नाबार्ड’कडून करण्यात आले आहे.

अधिकृत संकेतस्थळावर करा अर्ज

‘नाबार्ड’च्या वतीने शेतकऱ्यांना थेट कर्ज उपलब्ध करून देत असल्याच्या अफवांना बळी पडल्यास त्यातून नुकसान होऊ शकते. ‘नाबार्ड’च्या विविध योजनांसाठी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?

Crop Damage : घेवडा करपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी

Surya Ghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ७४ हजार ग्राहक वीज निर्माते

Nashik APMC : पांजरापोळ प्रकरणात नाशिक बाजार समितीला दणका

SCROLL FOR NEXT