Gaushala Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Sale Fraud : साडेतीन कोटींच्या जनावरांची गोशाळा संचालकांकडून परस्पर विक्री

Government Deception : बनावट हमीपत्रांचा वापर करीत पाच गोशाळांतील जनावरांची परस्पर विक्री करीत शासनाची तब्बल ३.८० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Bhandara News : बनावट हमीपत्रांचा वापर करीत पाच गोशाळांतील जनावरांची परस्पर विक्री करीत शासनाची तब्बल ३.८० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी गोशाळांच्या तब्बल ३३ संचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे भाकड जनावरांच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न गंभीर झाल्याने अशी जनावरे शेतकरी गोशाळांना सुपूर्द करतात. त्यांच्याकडून चाऱ्यासाठी ठरावीक शुल्कदेखील घेतले जाते. त्याबरोबरच गोवंशाच्या कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत अशी जनावरे जप्त केली जातात.

न्यायालयाच्या आदेशानुसार अशी जनावरे गोशाळांना सोपविली जातात. गोंदिया, नागपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाण्यांतर्गत २०१८ ते आतापर्यंतच्या कालावधीत अशा प्रकारच्या अनेक कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये जप्त केलेली जनावरे भंडारा जिल्ह्यातील पाच गोशाळांना सोपविण्यात आली होती.

मात्र गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश प्राप्त न करता परस्पर बनावट हमीपत्राच्या आधारे या जनावरांची विक्री केली. या माध्यमातून ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात लाखनी पोलिसांनी ३३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये मंगेश राघोते, विनोद बहेरे, धनंजय दिघोरे, मनोज राघोते, अजय मेश्राम, सविता भुते, झांशी राघोते, राजेश्‍वर कमाने, माणिक जिवतोडे, नाना जिवतोडे, भागवत शिवणकर, भोपेश ब्राह्मणकर, धनराज दिघोरे, दिनेश भाजीपाले, प्रभाकर जिवतोडे, सुरेश कापगते, शिवराम गिरेपुंजे, पांडुरंग कापगते, यशपाल कापगते,

शंभूभाई पटेल, राकेश सावे, ओमप्रकाश लांजेवार, भास्कर भोतमांगे, सचिन नागलवाडे, ओमप्रकाश भोतमांगे, श्‍यामराव चारमोडे, नरेश पिंपळशेंडे, मंगेश तरोणे, कैलास काळसर्पे, राकेश कटाणे, विनोद भोंडे, वामन कमाने, रवींद्र काळसर्पे (सर्व रा. पिंपळगाव सडक) यांचा समावेश आहे. या प्रकरणी भवरलाल जैन यांनी राज्य मानवी हक्‍क अधिनियमानुसार कारवाई केली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला.

गैरप्रकारात या गोशाळांचा आहे समावेश

अन्नपूर्णा गोरक्षण संस्था, भवानी गोशाळा, निर्मल गोशाळा, सुखरूप गोशाळा, मातोश्री गोशाळा

जालना जिल्ह्यातही गैरप्रकार

गोसेवा आयोगाच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातही दोन गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. त्यातील एक गोशाळा घनसावंगीमधील असून, याचे संचालक वकील आहेत. दुसऱ्या गोशाळेतील जनावरे दाखवून त्यांनी गोसेवा आयोगाच्या योजनांचे अनुदान लाटले. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT