Indigenous Cow Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Breeding : पशुधन पैदास धोरणात सुधारणा हव्यात

कर्नाल येथील संस्थेच्या मदतीने कुशल मनुष्यबळाव्दारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. स्थानिक प्रजातींच्या संवर्धनासाठी शासनाने निधी द्यावा.

Team Agrowon

Parbhani News : पशुधन पैदास धोरण (Livestock Breeding Policy) योग्यरीत्या राबविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. जातिवंत देशी प्रजातींच्या संवर्धनासाठी (Indigenous Cow) धोरणात सुधारणा हव्या आहेत, असा सूर पशू आनुवंशिक संसाधनांचे व्यवस्थापन’ विषयावरील २० व्या राष्ट्रीय परिषदेत शुक्रवारी (ता.२४) उमटला.

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशुवैद्यकीय पशुअनुवंश व पैदासशास्त्र विभाग आणि पाळीव प्राण्यांची जैवविविधता संवर्धन सोसायटी यांच्यातर्फे ग्रामीण उपजीविका संवर्धनासाठी ही परिषद झाली.

त्यात ‘पशुधन पैदास धोरण’ यावरील चर्चासत्र झाले.अध्यक्षस्थानी कर्नाल येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधने मंडळाचे संचालक डॉ. बी. पी. मिश्रा, तर अकोला येथील प्रा. डॉ. एस. पी. कुराळकर सहअध्यक्ष होते.

या वेळी ‘एनबीएजीआर’चे शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ गोवणे उपस्थित होते. चर्चासत्रात माजी अधिष्ठाता डॉ. अ. समद, महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, प्रा. डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. बी. एम. ठोंबरे, ‘अॅग्रोवन’चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे आदी सहभागी झाले होते.

डॉ. कुराळकर म्हणाले, ‘‘कर्नाल येथील संस्थेच्या मदतीने कुशल मनुष्यबळाव्दारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. स्थानिक प्रजातींच्या संवर्धनासाठी शासनाने निधी द्यावा.’’

डॉ. पोहरकर म्हणाले, ‘‘संकरीकरण मोहिमेमुळे देशी प्रजातींच्या संवर्धनाकडे होत असलेले दुर्लक्ष्य ही गंभीर बाब आहे.’’

डॉ. मार्कंडेय म्हणाले,‘‘काही गोशाळांमध्ये एकाच जातीचा वळू विविध जातींच्या गायींच्या रेतनासाठी वापरला जात आहे. त्यामुळे चुकीची पैदास होत आहे. त्यामुळे शुध्द गोवंशाला धोका निर्माण झाला आहे. वळूच्या अनिर्बंध वापरामुळे वंशविरहित पशुधनाची संख्या वाढत आहे. हे रोखण्यासाठी कायदेशीर कारवाईची गरज आहे.’’

डॉ. समद म्हणाले, ‘‘विद्यापीठे, महाविद्यालयांनी प्रक्षेत्रावरील अनुवंशशास्त्रीय सुधारणांबाबत श्वेत पत्रिका काढावी.’’

‘...तर गोवंश संवर्धन, संशोधनाला गती’

गद्रे म्हणाले,‘‘देशी गाय ही जमीन सुपीकता, मानवी आरोग्य, जातिवंत पैदास, शाश्वत ऊर्जा, प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय खत निर्मिती, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती या सोबत जोडली तर गोवंश संवर्धन आणि संशोधनाला गती येईल.

शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्थेतर्फे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक सहकार्याने कोकण कपिला गोवंशाचे संवर्धन आणि संशोधन केले जात आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT