Foreign tour of farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Foreign Tour : विदेश अभ्यास दौऱ्यांसाठी ५ फेब्रुवारीपर्यंत याद्या द्याव्यात

Farmer Study Tour : राज्य पुरस्कृत योजनेतून विदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ नुसार एकूण १०२ व राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ असे मिळून एकूण १२० शेतकरी व ६ अधिकारी यांची निवड केली जाणार आहे.

माणिक रासवे

Parbhani News : राज्य पुरस्कृत योजनेतून विदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ नुसार एकूण १०२ व राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ असे मिळून एकूण १२० शेतकरी व ६ अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील निवड प्रक्रिया पूर्ण करून ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शेतकरी याद्या कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला अवलंब. त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशांतील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी याद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी राज्य पुरस्कृत योजना २०२३ -२४ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलँड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, नेदरलंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राज्यातील योग्य त्या प्रगतिशील शेतकऱ्यांची विविध स्तरांवरील समित्यांमार्फत अंतिम निवड केली जाणार आहे. राज्यातील कोकण कृषी विभागातील ५ जिल्ह्यांतून १५ शेतकरी, नाशिक कृषी विभागातील ३ जिल्ह्यांतून ९ शेतकरी पुणे कृषी विभागातील ३ जिल्ह्यांतून ९ शेतकरी, कोल्हापूर कृषी विभागातील ३ जिल्ह्यांतून ९ शेतकरी, छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील ३ जिल्ह्यांतून ९ शेतकरी, लातूर कृषी विभागातील ५ जिल्ह्यांतून १५ शेतकरी, अमरावती कृषी विभागातील ५ जिल्ह्यांतून १५ शेतकरी, नागपूर कृषी विभागातील ६ जिल्ह्यांतून १८ शेतकरी असे एकूण १०२ शेतकऱ्यांची विदेशातील अभ्यास दोऱ्यांसाठी निवड केली जाणार आहे.

निवडीसाठीचे निकष...

विदेश अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण केले, तर सहलीच्या अंतिम दिवशी ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. शेतकरी वैध पासपोर्टधारक असावा. शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीत नसावा. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.

या अभ्यास दौऱ्यासाठी सर्व संवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये यापैकी कमी असेल ती अनुदान रक्कम देय आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसोबत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प

Marathwada Rain: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत हलका ते दमदार पाऊस

Okra Farming: भुसावळात प्रसिद्ध मयूरभाऊंची भेंडी

Desi Cucumber Seeds: अनेक वर्षांपासून जोपासलेले देशी काकडीचे बियाणे

Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार

SCROLL FOR NEXT