Farmer Foreign Tour : शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याचा मार्ग मोकळा

Farmer Study Tour : परदेशातील शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पुरवठा साखळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समजावी यासाठी काढण्यात येणारे दौरे पुन्हा सुरू झाले.
Foreign tour of farmers
Foreign tour of farmersAgrowon

Mumbai News : परदेशातील शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पुरवठा साखळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समजावी यासाठी काढण्यात येणारे दौरे पुन्हा सुरू झाले असून, यासाठी राज्य सरकारने १२० शेतकरी आणि सहा अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी एक कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने यासाठी दोन कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती.

मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परदेश दौऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीतून १० कोटींची तरतूद करू, असे सांगितले होते. त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीमधील एक कोटी ४० लाख रुपयांत परदेश दौरा आयोजित करावा लागणार आहे. २००४-०५ पासून सुरू असलेली ही योजना अनेकदा बंद पडली होती.

Foreign tour of farmers
Foreign tour of farmers : राज्यातील १२० शेतकऱ्यांना दीड कोटींचा निधी?

२०२०-२१ या आर्थिक वर्षात केवळ इस्राईल दौऱ्यासाठी शेवटची योजना आखली होती. त्यानंतर ही योजना बंद होती. परदेश दौऱ्यांत क्षेत्रीय भेटी, सलग्न विषयांबाबत प्रक्रिया संस्थांना भेटी, बाजारपेठा, कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था, दुग्ध व्यवसाय व फळबाग, फुलशेती आदींबाबत शेतकऱ्यांना ज्ञान व क्षमता उंचावण्याकरिता दौरे आयोजित करण्याचे उद्देश असतो.

२०१७ मध्ये परदेश दौऱ्यासाठी वेगवेगळ्या देशांसाठी देण्यात येणारा खर्च वेगवेगळा होता. शिवाय दौऱ्याच्या खर्चातील निम्मी रक्कम शेतकऱ्याला खर्च करण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्या वेळी जर्मनी, नेदरलँड, इस्राईल आणि ऑस्ट्रेलिया या देशांत दौरे काढले होते. या वेळी इस्राईलसाठी ५१ हजार, ४९९, जर्मनीसाठी ६३ हजार ८४८, ऑस्ट्रेलियासाठी एक लाख रुपये अनुदान दिले गेले होते.

Foreign tour of farmers
Farmers Study Tour : शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन

दरवर्षी नवे निकष आणि नियमांमुळे शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी जाताना अडचणी येत होत्या. आता राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या राज्य पुरस्कृत योजनेसाठी ई- निविदा राबविण्यास मान्यता दिली आहे. तसेच १२० शेतकरी आणि सहा अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्याकरिता १ कोटी ४० लाख रुपयांच्या प्रशासकीय कार्यक्रमास मान्यता दिली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त स्तरावरून मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत.

शेतकरी निवडीचे निकष...

संबंधित शेतकऱ्याच्या नावे सात-बारा आठ अ चा उतारा असावा.

शेतकऱ्याचे वय २१ ते ६२ च्या दरम्यान असावे.

शेतकऱ्याकडे वैध पारपत्र असावे.

संबंधित शेतकरी शासकीय अथवा निमशासकीय नोकरीत नसावा.

यापूर्वी शासकीय अर्थसाह्याने परदेश दौरा केलेला नसावा.

परदेश दौरा करण्यासाठी पात्र असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com