Soybean Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Survey of Yellow Mosaic : येलो मोझॅकचा सर्व्‍हे न करताच याद्या केल्या

Nitin Gawande : सर्व्हे न करताच अधिकाऱ्यांनी याद्या सादर केल्या. शेतकऱ्यांना अंधारात ठेवले, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर या हंगामात मोठ्या प्रमाणात येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला होता. याचा सर्व्हे न करताच अधिकाऱ्यांनी याद्या सादर केल्या. शेतकऱ्यांना अंधारात ठेवले, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

या वर्षी येलो मोझॅकमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये असताना त्याचा उत्पादन खर्च सद्धा मागील वर्षाच्या तुलनेत निघाला नाही. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्वेक्षण करून मदत देण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे.

येलो मोझॅकचे पंचनामे शेतात झालेत नाहीत. ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारची यादी प्रसिद्ध केला गेल्या नाही. यावर शेतकऱ्यांची हरकत सुद्धा मागवल्या गेल्या नाही.. सोयाबीनचे १०० टक्के बाधित क्षेत्र ग्राह्य धरून भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.

अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटेनच्या वतीने तीव्र अशा पद्धतीचे आक्रोश आंदोलन केल्या जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे, तालुका संघटक नीलेश गुल्हाने, तालुकाध्यक्ष महंमद शहाबुद्दीन, पंकज गुल्हाने, प्रमोद खेडकर, शुभम जंवजांळ, सलिम भाई, अरुण धर्माळे, सैय्यद रियाज, नितिन खेडकर, प्रविण ताकतोडे, सागर वानखडे, रविंद्र गावंडे, रामचंद्र गणेशपुरे आदिंच्या उपस्थितीत देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal: भारत-अमेरिका कराराचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?; खर्गेंचा सरकारला सवाल

India US Trade: अमेरिकन आयातशुल्काचा मागील चार महिन्यात महाराष्ट्राला फटका; कृषी निर्यातीत २६.६% घट

MGNREGA Workers Protest: मनरेगा कर्मचारी आंदोलनात; ग्रामीण भागात कामे ठप्प

Monkey Crop Damage: आजऱ्यात माकडांचा वाढला उपद्रव

Rose Harvesting: व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाची काढणी आणि व्यवस्थापनाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT