Fertilizer Linking Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Linking : लिंकिंगप्रकरणी कंपनीविरोधात बल्लारपूर ठाण्यात तक्रार दाखल

Fertilizer Sale : शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी खताचे वाटप आणि वितरण कसे करावे, या बाबत या कंपनीला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Team Agrowon

Nagpur / Chandrapur News : शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदीस भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीविरोधात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. सोमवारी (ता. ७) या विषयावर विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित केला जाईल. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी खताचे वाटप आणि वितरण कसे करावे, या बाबत या कंपनीला स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानंतरही कंपनी शेतकऱ्यांना अनावश्यक उत्पादने घेण्यास जबरदस्ती करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कोरोमंडल कंपनीला दोन नोटिसा दिल्या. लिंकिंगचा हट्ट धरू नये, असेही सुचवले होते.

त्यानंतर ही कंपनी शेतकऱ्यांना डीएपीची खरेदी करताना सल्फर, पीडीएम पोटॅश आणि १५:१५:१५ खते जबरदस्तीने घ्यायला लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले. या संदर्भात मी कृषी विभागाचे सचिव विकास रस्तोगी यांची वैयक्तिकरीत्या भेट घेतली.

चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे शेतकऱ्यांविरोधातील अन्यायकारक प्रकार होऊ नयेत, या बाबत त्यांचे लक्ष वेधले. तसेच, कोरोमंडल लिमिटेडचे विक्री व विपणन उपप्रबंधक प्रीतम सिंह यांच्याशी संवाद साधला.

शेतकऱ्यांवर जबरदस्ती इतर अनावश्यक निविष्ठा थोपवू नका आणि झालेल्या चुका तत्काळ दुरुस्त करा, अशी विनंती केल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. कंपनीचे विक्री व विपणन उपप्रबंधक प्रीतम सिंह यांच्याविरुद्ध तक्रार देताना भाजप कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय

शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रासायनिक खत नामांकित कंपन्यांकडून वितरित केले जाते. मात्र, या खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तूंची ‘लिंकिंग’ करून छोट्या विक्रेत्यांवर जबरदस्ती केली जाते. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो, याकडे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT