Fertilizer Linking : रासायनिक खतांचे विभागनिहाय समान वितरण व्हावे

Fertilizer Distribution : खते लिंकिंगचा मुद्दा गाजत असून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
Latur Fertilizer Scam
Latur Fertilizer ScamAgrowon
Published on
Updated on

Nashik News : खते लिंकिंगचा मुद्दा गाजत असून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्हा रासायनिक खते उत्पादक व विक्रेते बैठकीप्रसंगी नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनने (नाडा) रासायनिक खतांची विभागनिहाय समान वितरण व्हावे, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वी खत कंपन्यांनी किरकोळ खते विक्रेत्यांना दिलेला लिंकिंगचा माल परत करण्याबाबत चर्चा झाली.

कृषी विभाग आणि नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनची (नाडा) रासायनिक खते लिंकिंगसंदर्भात सोमवारी (ता. २) जिल्ह्याधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठक संयुक्तरित्या बैठक झाली. या बैठकीस नाशिक जिल्ह्यातील घाऊक खत विक्रेते, किरकोळ विक्रेते, नाडाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Latur Fertilizer Scam
Fake Fertilizer : वाशीम जिल्ह्यात बनावट खतसाठा जप्त

रासायनिक खते कंपन्यांनी लिंकिंग करू नये व किरकोळ विक्रेत्यांना रासायनिक खते लिंकिंगसह घेऊ नये अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या. तर रासायनिक खतांचे विभागनिहाय समान वाटप व्हावे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन रॅकचे वितरण करावे अशी मागणी ‘नाडा’तर्फे करण्यात आली.

कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रत्येक खते विक्री केंद्रावर फलक लावण्यासह उपलब्ध खतांचा साठा, दर याची अद्ययावत माहिती यासह ई-पीओएस साठा दररोज प्रत्यक्ष साठ्याची सुसंगत ठेवण्याच्या सूचना कृषी विभागाने या वेळी केल्या.

Latur Fertilizer Scam
Fertilizer Supply : खत कंपन्यांकडून युरिया, डीएपी पुरवठा नाही

बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी देवदत्त केकाण उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, कृषी अधिकारी विजय केदार, विजय धात्रक आदी उपस्थित होते.

‘नाडा’चे अध्यक्ष अरुण मुळाणे, ललित जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन गीते यांनी लिंकिंग संदर्भातील अडचणी कृषी विभागासमोर मांडल्या. बैठकीस मंगेश तांबट, ललित जाधव, संतोष पाटील, चंद्रकांत ठक्कर, गोकुळ महाले, विनोद खिवंसरा, काकासाहेब भालेराव, दिनेश मुंदडा, रामभाऊ जाधव, प्रकाश बोडके, गोकुळ मानकर, नितीन काबरा आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com