Cotton Varieties Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Varieties : दर्यापूर तालुक्‍यात विशिष्ट कापूस वाणासाठी रांगा

Cotton Varieties Update : एका विशिष्ट कापूस वाणाची शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याने दर्यापूर तालुक्‍यात कृषिसेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. येवदा येथे एका केंद्रावर तर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Team Agrowon

Amravati Cotton News : एका विशिष्ट कापूस वाणाची शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याने दर्यापूर तालुक्‍यात कृषिसेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. येवदा येथे एका केंद्रावर तर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

मात्र पोलिसांनाही शेतकरी जुमानत नसल्याने अखेरीस बियाणे विक्री बंद करावी लागली. मंगळवारी (ता.२७) दर्यापुरातील अनेक केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याने या ठिकाणी कृषी विभागाची हतबलता चव्हाट्यावर आली आहे.

यंदाच्या हंगामात जाणीवूर्पक एका विशिष्ट कंपनीच्या कापूस वाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याआड या कंपनीच्या वाणाची जिल्ह्यात सर्वदूर जादा दराने विक्री करण्याचे प्रकार घडत आहेत. ८५० रुपये किमतीचे पाकिट सर्रास ११०० ते १२०० रुपयांना दिले जात आहे.

दर्यापूर तालुक्‍यात अशा प्रकारांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली असून त्याचा निषेध म्हणून अनेक संघटनांनी आंदोलनात सातत्य ठेवले आहे. मंगळवारी (ता.२७) देखील अनेक कृषिसेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा अनुभवण्यात आल्या.

जिल्ह्यात गेल्या हंगामात दहा लाख कपाशी बियाणे पाकिटांची विक्री झाली होती. त्याआधारे यंदाच्या हंगामाकरिता १२ लाख पाकिटांची मागणी करण्यात आली. मागणी असलेल्या कंपनीच्या वाणाची १ लाख ६० हजार पाकिटांचे वाटप होते. त्यातील १ लाख ५५ हजार पाकिटे मागणी असलेल्या वाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहेत. यंदा मात्र याच वाणाची मागणी अधिक असल्याने जास्त ताण पडत आहे. परिणामी काही कृषिसेवा केंद्रांवर कृषी सहाय्यकाची नियुक्‍ती करण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत एक ते दोन पाकिटे दिली जात आहेत.
राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Millet Processing Center: आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते ‘मिलेट उत्कृष्टता केंद्रा’चे भूमिपूजन

Livestock Compensation: राज्य सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीमुळे दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत

Unseasonal Rain Impact: अवकाळी आणि गारपिटीमध्ये आंबा- काजू बागेची काळजी कशी घ्यावी?

Appointment of Land Surveyors: जिल्हास्तरावर निविदा प्रक्रियेद्वारे ‘भूमापकां’ची नियुक्ती

Free Electricity Scheme: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या सवलतीपोटी २,२९४ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT