Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : खानदेशात हलका पाऊस

Dhule Rain : सोमवारी धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील अमळनेर, पारोळा भागात हलका ते तुरळक पाऊस झाला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सोमवारी (ता.१६) सकाळी व मंगळवारी (ता.१७) देखील अनेक भागात हलका पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पावसाळी वातावरणाचा धसका घेतला असून, कापूस वेचणी, केळीची काढणी वेगात सुरू आहे.

तीन-चार दिवसांपासून खानदेशात ढगाळ वातावरण आहे. उकाडा, उष्णता जाणवत आहे. मध्यंतरी काही दिवस सकाळी कोरडे किंवा निरभ्र वातावरण व दुपारी ढगाळ, उष्णता अशी स्थिती होती. परंतु मागील दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. यातच सोमवारी धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील अमळनेर, पारोळा भागात हलका ते तुरळक पाऊस झाला. तसेच मंगळवारीदेखील जळगाव, धरणगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत तुरळक सरी सकाळी कोसळल्या. कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही.

'ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणीचे काम सुरू आहे. सोयाबीन, मका कापणी, मळणीचे कामही सुरू आहे. तसेच कांदेबाग केळीची काढणी चोपडा, जळगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात सुरू आहे. पपई पिकही काढणीवर आले आहे. रब्बी पिकांची पेरणीची घाईदेखील शेतकरी करीत आहेत. अशातच पावसाळी वातावरण तयार झाल्याने नुकसानीची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मजुरांची जवळवाजुळव करून शेतकरी कापूस वेचणी व इतर कामे उरकून घेत आहेत. केळीची काढणीदेखील करून घेतली जात आहे. कारण तापी, गिरणा नदीच्या भागात काळ्या कसदार जमिनीत पावसामुळे रस्ते चिखलमय होतात. यातून वाट काढणे अशक्य होते. पपई, केळी शेतातच पक्व होऊन नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे शेतकरी पिकांची काढणी, मळणी, वाहतुकीचे काम उरकून घेत आहेत. तसेच कापूस शेतकरी वाळवून घेत आहेत. यात अधिकचे श्रम लागत आहेत.

उष्णता कायम

या महिन्यात सुरुवातीचे काही दिवस निरभ्र वातावरण होते. यामुळे दिवसा काही तास उष्णता असायची, परंतु सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण व्हायचा. थंडीची चाहूलदेखील लागत होती. परंतु मागील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढली आहे. यात लहान केळी बागांत बुरशीजन्य रोग सक्रिय होऊन नुकसानीची भीती आहे. भाजीपाला पिकांतही रोगराई येऊ शकते. यामुळे शेतकरी निर्देशानुसार फवारणी व खते देण्याची कार्यवाही करून घेत आहेत. यात उत्पादन खर्च मात्र काहीसा वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Issues: उद्दिष्टात घट, गोंधळात वाढ

Local Varieties Management Workshop: आज ‘वनामकृवि’त स्थानिक वाणांच्या व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन

Maharashtra Irrigation Conference: बेलेवाडी- काळम्मात उद्यापासून महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित

Banana Crop Shredding Machine: यंत्राद्वारे केळी खोडाची कुट्टी

Pipeline Irrigation Policy: शेतीला बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठ्याचे धोरण

SCROLL FOR NEXT