Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2024 : पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

Rain Forecast News : मागील २४ तासांत अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही मंडलांमध्ये पावसाने हजेरी दिली. यामुळे तापमानात घट झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत आहे.

Team Agrowon

Akola News : मागील २४ तासांत अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही मंडलांमध्ये पावसाने हजेरी दिली. यामुळे तापमानात घट झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत आहे.

मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार, वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात या आठवड्यात चांगला पाऊस झालेला आहे. या तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये सार्वत्रिक पाऊस झाला.

भर जहाँगीर २६, मोप ३६, वाकद २६.३, केनवड १५, गोवर्धन ७३.८, रिठद ५३.८, कवठा ४२.३, जऊळका १५.८, चांडस ३४, रायगाव १३.८, वारला २०.५, केकतउमरा १८.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

बुलडाणा जिल्हयात धाड १४, पाडळी १५.८, म्हसला ४१.८, देऊळगावराजा १५.५, देऊळगावराजा ग्रामीण ६५.३, तुळजापूर ७३.३, मेहुणराजा ६०.८, अंढेरा १४, मेहकर २१.३, डोणगाव १७.३, सिंदखेडराजा ११६.५, किनगावराजा २१, मलकापूरपांग्रा ५२.५, दुसरबीड १६.५, सोनोशी ४४.३, शेंदुर्जन ४८, लोणार ३५.३, सुलतानपूर ३६.५, टिटवी २६.३, हिरडव ६८.३, अंजनी खुर्द १९.५, लाखनवाडा १५.५, आवार १३.५,

अटाळी २०.८, जवळा बुद्रूक २२.५, नरवेल १७.८, धरणगाव १७.८, मोताळा ३३.३, धामणगाव ३४.५, रोहिणखेड २०.३, पिंपळगाव देवी ३४.५, शेंबा २५.३ पाऊस नोंद झाली. दुसरीकडे अकोला जिल्हयात बाळापूर व इतर तालुक्यातही चांगला पाऊस झाला.

यात बाळापूरमध्ये २२.५, पारस २५, व्याळा १५, वाडेगाव १३.५, उरळ बुद्रुक ४४.५, निंबा ५४, अकोला २९.५, घुसर २०.३, शिवणी २५.३, पळसो बढे १६.३, सांगळुद २०.३, कुरणखेड २६.५, कौलखेड २०.८, शेलू बाजार ३० मिलिमीटर पाऊस झालेला.

पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा

या विभागात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, काही ठिकाणी मृगसरी झालेल्या असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला. काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागत केली जात आहे. बाजारपेठांमध्ये बी-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी लगबग वाढलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांचे 'रेल रोको आंदोलन' रद्द; न्यायालयात लेखी हमीपत्र सादर

Rabi Season: अमरावती जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर रब्बी हंगाम

Banana Cultivation: खतांचा समतोल वापर करून मिळवा केळीचे अधिक उत्पादन!

Ujani Dam Discharge: उजनी धरणातून शेतीसाठी यंदा तीन आवर्तने सोडणार

Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांची नासाडी

SCROLL FOR NEXT