Marathwada Rain : मराठवाड्यात मुसळधार पाऊस

Monsoon Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाड्याच्या अनेक भागात मॉन्सूनचा धुमाकूळ सुरूच आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाड्याच्या अनेक भागात मॉन्सूनचा धुमाकूळ सुरूच आहे. लातुर, धाराशिव, जालना, बीड, धत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. धाराशिवमधील ढोकी मंडलात सर्वाधिक १८७.५ मिलिमीटर पाऊस पडला असून खरीप पेरण्यांना या भागात वेग येणार आहे. मंगळवारी (ता. ११) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना कोकणातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून रायगडमधील मुरूड मंडलात सर्वाधिक १२०, नंदगाव मंडलात ११९ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने भात रोपवाटिकेसह इतर शेती कामांना सुरुवात झाली आहे. शेतकरी शेतात कामे करताना दिसून येत आहे आहे.

Rain Update
Rain Update : सांगली जिल्ह्यात दहा दिवसांत १२९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद

खानदेशात सोमवारी (ता. १०) सायंकाळी व रात्री अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस झाला. काही भागांत मध्यरात्रीनंतर हलका ते मध्यम पाऊस झाला. शेतकरी मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असून, या पावसाने पेरणीला गती मिळेल.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सोमवारी पुन्हा तो बरसला. रात्री उशिरापर्यंत त्याची रिपरिप सुरूच होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पहाटेपासून पावसाची संततधार थांबून-थांबून सुरूच राहिली. जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागांत सर्वदूर पाऊस व्यापल्याचे चित्र राहिले.

Rain Update
Monsoon Rain : मराठवाड्याला पावसाने धुतले

सांगली, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने उसंत घेतली होती. सांगलीत पावसामुळे जिल्ह्यातील येरळा, अग्रणी नद्या, ओढे दुथडी वाहू लागल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील बळीराजा सुखावला आहे. नगर जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस सुरू झाला होता. चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश भागात पेरण्यालायक परिस्थिती झाली असून पेरण्याला वेग येईल असे दिसतेय.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पावसाने चांगलीच बॅटिंग केली. यात लातूर जिल्ह्यात दहापैकी सहा तालुक्यांत तर धाराशिव जिल्ह्यातील आठपैकी दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या आठही तालुक्यांत ६० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. या पावसाने आता खरिपातील पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असून वापसा होताच शेतकरी आता पेरण्यांना सुरुवात करणार आहेत.

सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता. ११) सकाळी सातपर्यंत सुरू होता. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७५ मंडलांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ५१ पैकी ४९ मंडलांत हलका ते मुसळधार पाऊस झाला.

विदर्भात मागील २४ तासांत अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही मंडलांमध्ये पावसाने हजेरी दिली. यामुळे तापमानात घट झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात या आठवड्यात चांगला पाऊस झालेला आहे. या तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये सार्वत्रिक पाऊस झाला.

शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली मंडले ः (स्त्रोत कृषी विभाग)

बाळानगर १००.८, वाटूर १०५.५, घनसांगवी १०७.३, कासारखेडा १०६.८, मुरूड ११५.८, लामजना १०२, किल्लारी १०२.०, निलंगा १११.५, चाकूर १००.८, आष्टा ११२.५, शिराढोण १०१.३, गोविंदपूर ११८.८, नारंगवाडी १०१.३,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com