Maharashtra Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात सर्वदूर हलका, मध्यम, दमदार पाऊस

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्वच मंडलांत सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची हलकी, मध्यम, दमदार हजेरी लागली. छत्रपती संभाजीनगर, बीड व धाराशिव या तीन जिल्ह्यातील ८ मंडलांत अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ८० मंडलात पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एका व कन्नड तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडलांपैकी ४८ मंडलांत हलका, मध्यम तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडलांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.

बीड तालुक्यातील दोन व वडवणी तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील सर्व साठ मंडलांत पावसाची हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. धाराशिव जिल्ह्यातील सर्व ४२ मंडलांत हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला. या जिल्ह्यातील धाराशिव व वाशी या तालुक्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली.

पाचही जिल्ह्यातील चार दोन अपवाद वगळता सर्व मंडलांत एकाच वेळी पावसाने लावलेल्या हजेरीने बळीराजा सुखावला आहे. अर्थात पिकाची अधिक जोमाने वाढ होण्यासाठी व पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी पावसाची अत्यंत आवश्यक आहे. सोमवारी दुपारपर्यंत सर्वदूर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाच्या अधून मधून सरी सुरूच होत्या.

जिल्हानिहाय मंडलांतीलपाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर २०.३, उस्मानपुरा २१.८, भावसिंगपूर ४८.५, कांचनवाडी ४८.५, चित्तेपिंपळगाव ३१, हरसुल २४.५, चौका २०, पंढरपूर ४८.५, पीसादेवी ४३.५, वरुड काजी ४३.५, पिंपळवाडी २२.३, गंगापूर ४७, मांजरी ३१, भेंडाळा ३५.८, तुर्काबाद ३८.८, वाळूज ४५.५, हरसुल ५०.३, डोणगाव ४६.३, आसेगाव ५५, गाजगाव ३९.८, जामगाव ३८.५, खंडाळा ३२.८, शिवूर ४२.५, बोरसर ३२.८, लोणी ३६.८, गारज ४७.८, लासुरगाव ५१.५, महालगाव ३८.८, नागमठाण ३३.५, लाडगाव ४४.८, जानेफळ ३१.५, बाबतारा ३३.८, देवगाव ३९.३, चिकलठाणा ४६.५, नाचनवेल ४५, चिंचोली २५.५, करंजखेड २५.५, नागद ३४.३, वेरूळ ५७.३, सुलतानपूर २०, बाजार सावंगी ५१.५, निल्लोड २०.५, गोळेगाव ६२.५, आमठाणा ४५, बोरगाव ४५, अंभई ६२.८, शिवना २४.८, उंडणगाव ४६, सावलदबारा ३८.८, बनोटी ३२, जरंडी ५५.५, बाबरा २९.८.

जालना

भोकरदन ४८.८, धावडा २८.८, पिंपळगाव ४१, टेंभुर्णी ३६.५, जालना शहर २२.८, अंबड २५.५, आष्टी २०.३, बदनापूर २२.३, रोशनगाव २२.३, घनसावंगी ५०.३, तीर्थपुरी २८.८, अंतरवाली ३४, कुंभार पिंपळगाव ३४, जाम समर्थ ४२.३, तळणी २३.३.

बीड जिल्हा

बीड ५१, पाली ४७.३, म्हालसाजवळा ५७ ,नाळवंडी ३०, पेंडगाव ४७ ,चौसाळा ३९ ,लिंबागणेश ५२.३ ,पाटोदा ३७.५ ,दासखेड ५९.३,थेरला २७.३, अमळनेर ३८.५, गेवराई २५.३, मादळमोही ४२, पाचेगाव ३१, चकलांबा २७.५, तलवाडा २७, तालखेड २९.५, नित्रुड २१, पाटोदा ४२, लोखंडी सावरगाव ४३.३, बर्दापूर ३२.८, युसुफ वडगाव २४, हनुमंत पिंपरी ६३, होळ २५.३, नांदुर घाट २१.३, नागापूर २२, धारूर ५५.५, तेलगाव २१.३, वडवणी ३७.८, शिरूर कासार २९.८, रायमोह ३०.५, तिंतरवणी ३१.८.

लातूर

मुरुड २२.८, तांदूळजा २६.८, चिंचोली २०.३, लामजाणा ३७.५, मातोळा ५१.५, बेलकुंड ४७, किल्लारी ३४.५, उजनी ३८.३, खंडाळी २५.५, मोघा ४२, मोरेगाव ३२.८, पळशी ३२.८, शिरूर ताजबंद २०.

धाराशिव जिल्हा

धाराशिव शहर २२.३, बेंबळी ५७.३, पाडोळी २६.५, केशेगाव ५८.८, जागजी २९.५, इट ३७.८, ईटकुर २९.३, येरमाळा ६०, उमरगा २७, नारंगवाडी २८.३, मुळज २४.३, लोहारा २६, माकणी ३७ ,वाशी ३८.८ तेरखेडा ४८.३.

अतिवृष्टीची मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

सिद्धनाथ वडगाव ६५.५

कन्नड ८५.८

चापानेर ८५.८

बीड जिल्हा

राजुरी ८२.८

पिंपळनेर ९४.८

कवडगाव ६९.८

धाराशिव जिल्हा

धाराशिव ग्रामीण ८७

पारगाव ६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT