Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Ahamadanagar Rain : नगर जिल्ह्यात सर्वदूर रिमझीम; मात्र अद्यापही १० गावांसह ४० वाड्यावस्त्यांची तहान ८ टँकरवर

Ahamadanagar Rain Update : गुजरात किनारपट्टीवर तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यात जनजीवनविस्कळीत झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गुजरात किनारपट्टीवर तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस वाढला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड या जिल्ह्यांत रविवारी पावसाने दाणादाण उडवून दिली. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील रविवारी (ता.१) पावसाची रिमझीम झाली. गेल्या तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस सायंकाळी सुरू झाला.

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, नगर, कर्जत, जामखेड, अकोले, पाथर्डी, पारनेरात परिसरात पाऊस झाला. यामुळे नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा धरणात पाण्याची आवक झाली.

जायकवाडी भरण्याच्या दिशेने

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८७.४ टक्क्यांवर आला असून गेल्या वर्षी याच दिवशी तो ३३. ६३ टक्के होता. नगर आणि नाशिक जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे येथील धरणांमधून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडले जात आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत ३९.७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

भर पावसाळ्यात जनता टँकरच्या पाण्यावर

सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस होत असून अनेक ठिकाणी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे नद्या, नाले ओसांडून वाहू लागले आहेत. यादरम्यान नगरमध्ये देखील सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. मात्र नगर जिल्ह्यातील १० गावांसह ४० वाड्यावस्त्यांना अद्यापही ८ टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे समोर आले आहे.

शासनाच्या साप्ताहिक टँकर अहवालानुसार ५ ऑगस्ट ते २६ ऑगस्टच्या नोंदीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. तर गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ५५ गावांसह २८३ वाड्यावस्त्यांना ४७ टँकरवर आपली तहान भागवावी लागत होती. सध्या संगमनेर तालुक्यातील ७ गावांसह २४ वाड्यांना ५ टँकरने पाणी पुरवले जात आहे. तर या ५ टँकरवर ९ हजार ५०० शेहून अधिक लोकसंख्या यावर अवलंबून आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आवश्यक ठिकाणी टँकरला मंजुरी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT