G-20 Council Agrowon
ॲग्रो विशेष

G-20 Conference : समन्वयातून जी-२० परिषद यशस्वी करुया

जी-२० परिषदेच्या यशस्वीतेमुळे आपल्या जिल्ह्याची जगामध्ये एक चांगली प्रतिमा तयार होणार आहे. सध्या शहरात सौंदर्यीकरणाचे खूप चांगले काम सुरू आहे.

Team Agrowon

G-20 Council in Aurangabad : जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त शहरात जगभरातील पाहुणे येणार आहेत. देशांतील ५६ शहरांमध्ये आपल्या जिल्ह्याला आयोजनाची संधी मिळाली आहे.

त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून जी-२० (G-20 Conference) परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी ( ता.११) जी-२० आणि वेरुळ-अजिंठा महोत्सवाच्या अनुषंगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.

बैठकीला आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय , तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, की जी-२० परिषदेच्या यशस्वीतेमुळे आपल्या जिल्ह्याची जगामध्ये एक चांगली प्रतिमा तयार होणार आहे. सध्या शहरात सौंदर्यीकरणाचे खूप चांगले काम सुरू आहे. शहराची प्रतिमा उंचावण्याचे काम प्रशासन करतच आहे मात्र त्यात नागरीकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे.

आपले शहर आणखी चांगले बनविण्यासाठी प्रयत्न करूया. पोलिस आयुक्तांनी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, आपले वाहन बेशिस्तपणे कुठेही उभे करु नयेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने या कालावधी दरम्यान कोणत्याही पक्षाने आंदोलन करु नये, असे आवाहन केले.

याला सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवित आंदोलन न करण्याचे आश्वासन यावेळी दिले. बैठकीला डॉ. कल्याण काळे, कल्याण चव्हाण, भाऊसाहेब जगताप, अशफाक सलामी, सुधाकर शिंदे, सुमीत खांबेकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT