Director of National Pomegranate Research Center Dr. Rajeev Marathe Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advice : शेतकऱ्यांच्या अनुभवाला देऊ शास्त्राची जोड

Director of National Pomegranate Research Center Dr. Rajeev Marathe : शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शास्त्राची सांगड घालून काम करूया अशी साद डाळिंब उत्पादकांना घातली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी डोळस असला की काय होऊ शकते याची प्रचिती म्हणजे ‘शरद किंग’ या डाळिंबातील वाणाची निर्मिती शेतीला भक्कम करण्यासाठी शेतकऱ्यांचा अनुभव आणि शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शास्त्राची सांगड घालून काम करूया अशी साद सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी डाळिंब उत्पादकांना घातली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुपेवाडी (ता. पैठण) येथे प्रयोगशील शेतकरी विठ्ठलराव भोसले यांनी विकसित केलेल्या ‘शरद किंग’ या डाळिंब वाणाची पीक पाहणी व डाळिंब परिसंवादाचे गुरुवारी (ता. ५) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मराठे बोलत होते.

या कार्यक्रमाला विठ्ठलराव भोसले यांच्यासह सह्याद्री फार्मसचे विलास शिंदे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेश बाबू के., विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. शिल्पा पी, डॉ. रूपा सौजन्य, डॉ. सोमनाथ पोखरे, व्यावसायिक के. डी. चौधरी, व्हिगर ॲग्रोटेकचे नीलेश वसेकर, अरबी हर्बलचे संचालक रामदास पाटील, डाळिंब संघ उपाध्यक्ष ब्रह्मदेव दुधाळ, डाळिंब संघ उपाध्यक्ष प्रताप काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील जवळपास एक हजारांवर शेतकऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. प्रास्ताविक श्री. वसेकर यांनी केले. सुरुवातीला शेतकरी बद्रीनाथ नलावडे यांच्या शेतावरील ‘शरद किंग’ डाळिंब बागेची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांनी केली. डाळिंब उत्पादक विठ्ठलराव भोसले यांच्या अथक परिश्रमातून डाळिंबाचे शरद किंग वाण विकसित झाले आहे.

डॉ. मराठे म्हणाले, की डाळिंब एकमेव २० ते २५ टक्के क्षेत्रवाढ होणारे फळपीक आहे. इतर पिकांच्या क्षेत्रामध्ये स्थिरता आली आहे. सगळीकडे केवळ भगवा डाळिंब वाण दिसते. शरद किंगच्या रूपाने आता शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाला आहे. अलीकडील काळात डाळिंबात रोगांचे प्रमाण वाढत आहे. बागेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

हवामान बदलाचे संकटही गंभीर आहे. उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी जास्तीचे पाणी, खते व कीडनाशकांचा वापर थांबवायला हवा. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. विविध राज्यातील सणांचे महत्त्व ओळखून आपल्याकडील फळ पिकांचे उत्पादन नियोजन करता येईल का, याकडेही उत्पादकांनी लक्ष द्यावे.

आपल्याकडील फळाचे गुण कसे याची मार्केटिंग प्रभावीपणे उत्पादकाला करता यावी. या वेळी श्री. शिंदे, श्री. पाटील, श्री. चौधरी, डॉ. मोटे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या वेळी श्री. भोसले यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ‘शरद किंग’ वाणाच्या विकासाच्या वाटचालीत परिश्रम व सहकार्य लाभलेल्या व्यक्तींचे आभार श्री. भोसले यांनी मानले. तांत्रिक सत्रात डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT