Agriculture Advice : पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये : बऱ्हाटे

District Superintendent Agriculture Officer Bhausaheb Barhate : पेरणीसाठी सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी करूनच बियाणे वापरावे. स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावे.
District Superintendent Agriculture Officer Bhausaheb Barhate
District Superintendent Agriculture Officer Bhausaheb BarhateAgrowon

Nanded News : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. तसेच पेरणीसाठी सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी करूनच बियाणे वापरावे. स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

सोयाबीन या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल.

District Superintendent Agriculture Officer Bhausaheb Barhate
Agriculture Advice : पाऊस ७५ मिलिमीटर पडल्यावरच करा पेरणी

मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनेअंतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते. प्रमाणित बियाण्यांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी.

District Superintendent Agriculture Officer Bhausaheb Barhate
Agriculture Advisory : कृषी सल्ला

सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची त्याची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी.

बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लॉनटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीन उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवनक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. मार्केटमधील बियाणे खरेदी केलेल्या केलेल्या बॅगमधील प्रातिनिधिक स्वरूपातील बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com