Farmer Study Tour Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Study Tour : शेतकऱ्यांनी जाणले रसायनमुक्त शेतीचे धडे

Chemical Free Farming Method : अकोला, वाशीम जिल्ह्यांत काही शेतकरी रसायनमुक्त शेती पद्धतीकडे वळाले आहेत.

Team Agrowon

Akola News : सध्या रासायनिक खते, किटकनाशकांच्या वापरामुळे उत्पादनाचा खर्च वाढला. परिणामी शेतीतील घाटा वाढत असल्याने शेतकरी पर्याय शोधत आहेत. शिवाय या घटकांच्या वापरामुळे जमिनीचे, पर्यावरणाचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

परिणामी अकोला, वाशीम जिल्ह्यांत काही शेतकरी रसायनमुक्त शेती पद्धतीकडे वळाले आहेत. या शेतकऱ्यांच्या गटाने एकत्र येत स्वखर्चाने अहमदाबाद येथे गोतीर्थ विद्यापीठात अभ्यास दौरा केला. या वेळी गोपालभाई सुतरिया यांनी या गोपालन, रसायनमुक्त शेती पद्धतीचे ज्ञान दिले.

वाशीम जिल्ह्यात रसायनमुक्त शेतीमध्ये शेतकरी प्रयोग करीत आहेत. या पद्धतीने संत्रा, हळद, लिंबू, कांदा, खरिपात सोयाबीन, तूर अशा पिकांचे उत्पादन काढत आहेत. या शेतकऱ्यांनी गोकृपामृतचा वापर यासाठी चालवला आहे.

गोकृपाअमृतचे जनक गोपालभाई सुतरिया यांनी या शेतकऱ्यांना निमंत्रित करीत अहमदाबाद येथोली गोतीर्थ विद्यापीठात मंगळवार (ता.२३) व बुधवार (ता.२४) असे दोन दिवस मार्गदर्शन केले.

यामध्ये गोकृपाअमृतचा वापर, तयार करण्याच्या पद्धती, पीक प्रात्यक्षिक प्लॉटला भेटी, कंपोस्ट बनविण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, या शेती पद्धतीसाठी देशी गोपालनाचे महत्त्व स्पष्ट केले. या अभ्यास दौऱ्यासाठी वाशीम कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांच्यासह अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांतील ४१ शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Import Policy : आयातीवर ५० टक्के शुल्क लावण्याची उद्योगांची मागणी; पिवळा वाटाण्याने पाडले तूर, मसूर, हरभऱ्याचे भाव

Urea Shortage : आंध्र प्रदेशमध्ये युरिया टंचाई नाही; मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा दावा, वायएसआरवर केली टीका

Soybean Crop Care: सोयाबीन पिकाचे निरीक्षण कसे करावे व कोणती लक्षणे पाहावीत?

Rain Alert Maharashtra : उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

PM Awas Yojana : अमरावतीत ‘पंतप्रधान घरकुल’चे १.११ लाख लाभार्थी वाढले

SCROLL FOR NEXT