Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : राजापुरात भाताच्या ओंब्यांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण कमी

Paddy Production : अनियमित पावसाचा फटका भातशेतीच्या उत्पादनाला बसला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : अनियमित पावसाचा फटका भातशेतीच्या उत्पादनाला बसला आहे. भात पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरण्याच्या कालावधीत असताना पाऊस पडल्यामुळे भाताच्या कणसांमध्ये चिंब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ओंब्यांमध्ये दाण्यांची संख्या कमी आणि चिंब जास्त अशी स्थिती असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. राजापुरात ही परिस्थिती अधिक आहे. त्यामुळे तुलनेत यावर्षी भात पिकामध्ये सरासरी पाच ते दहा टक्के घट होईल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र, मळेशेती समधानकारक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाला आहे. कमी पावसाचा भूगर्भातील पाणीसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता अधिक आहे.

पावसाने पूर्णविराम घेतल्यानंतर जिल्ह्यात भात कापणीला वेग आला आहे. कमी आणि भातपिकाला आवश्यक होता, तेव्हा अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे भातशेतीला फटका बसणार आहे. पुरेशा पाण्याअभावी रोपांची चांगली वाढ झालेली नाही. त्यामुळे ओंब्यांमध्ये दाणे नाहीत.

अनेक ठिकाणी दाण्यांपेक्षा चिंब (दाणाच भरलेला नाही) असण्याचे प्रमाण जास्त राहिले आहे. खर्चाच्या तुलनेत भातशेतीमधून कमी उत्पन्न मिळणार आहे. ही परिस्थिती वरकस म्हणजेच कातळावरील शेतीमध्ये सर्वाधिक आहे.

परंतु मळेशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. त्या भागात यंदा भातशेतीचे उत्पादन समाधानकारक आहे. याला भात संशोधन केंद्राचे संशोधक व्ही. व्ही. दळवी यांनीही दुजोरा दिला आहे.

पावसाच्या सातत्याच्या अभावाचा भातशेतीला चांगलाच फटका बसला आहे. जेव्हा पावसाची वा पाण्याची आवश्यकता होती तेव्हा पाऊस वा पाणी पिकाला मिळाले नाही. त्याचवेळी पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरण्याच्या कालावधीत असताना पाऊस पडल्याने भाताच्या कणसामध्ये चिंब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये भात उत्पादनामध्ये सरासरी पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे
- नामदेव नागरेकर, शेतकरी
दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला असला तरी त्याचा भातशेतीच्या उत्पादनावर फारसा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. भाताच्या कणसामध्ये दाण्यांचे प्रमाण सद्यःस्थितीत चांगले दिसत आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांचा संकरित बियाणे वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भातशेतीचे उत्पादन समाधानकारक राहील असा अंदाज आहे.  
- अनिल गावीत, राजापूर तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT