Agriculture Labour
Agriculture Labour Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Labour : परप्रांतीय शेतमजुरांमुळे मजूरटंचाई काहीशी कमी

मुकूंद पिंगळे

नाशिक : स्थानिक पातळीवर शेतमजुरांची टंचाई (Agriculture Labour Shortage) मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे मजुरीदरात भरमसाट वाढ झाली आहे. अधिक पैसे मोजूनही स्थानिक मजुरांना विनंत्या कराव्या लागतात. परिणामी, हंगामी कामांत अडचणी येऊन नियोजन कोलमडते. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना मध्य प्रदेश, गुजरातसह काही प्रमाणात उत्तरप्रदेश व बिहार राज्यातील शेतमजुरांची (Agriculture Labour) मोठी मदत होत आहे. तुलनेत कमी मजुरी व कामासाठी खात्रीशीर उपलब्धता असते. खरीप हंगामात जवळपास २० हजार मजुरांचे हात राबत असल्याचे समोर आले आहे. या शेतमजुरांमुळे मजूरटंचाईवर मात होण्यास मोठा हातभार लागत आहे.

खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकरी बागायती पिके घेऊ लागले आहेत. मात्र एकाचवेळी कामे आल्याने कामासाठी स्थानिक मजूर वेळेवर उपलब्ध नसतात. मिळाले तर ते सांगतील तो रोजगार देऊनच कामे करावी लागतात. मजुरीत वाढ झाली पण तुलनेत उत्पन्न नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी परप्रांतीय मजूर मोठा आधारस्तंभ ठरत आहेत. हे मजूर प्रामुख्याने भूमिहीन तर काही अल्पभूधारक आहेत. पीकपद्धतीची कामे त्यांना नवीन होती. मात्र आता अनुभवातून ते शेतीकामांत कुशल झाले आहेत. खरीप हंगामात बाजरी, मका व सोयाबीन सोंगणी, कापूस वेचणी, खरीप कांदा लागवड तर रब्बीत उन्हाळ कांदा लागवड व काढणी, आले काढणी अशी कामे हे मजूर कुशलतेने करतात. यामध्ये गुजरात व मध्य प्रदेशमधील मजुरांची संख्या तुलनेने अधिक आहे.

जिल्ह्यातील शेती दृष्टिक्षेपात :

एकूण गावे...१,९६१

खरीप पिके घेणारी गावे...१,६७८

रब्बी पिके घेणारी गावे...२,८३

खातेदार...८,४४,५६५

परप्रांतीय मजुरांचा शेतकऱ्यांना असा आहे फायदा

- स्थानिक मजुरांच्या तुलनेत मजुरी कमी

- एका दिवशी ८ ते १० तासांपर्यंत काम

- शेतमालकाने सूचनेप्रमाणे काम

थोड्याफार प्रमाणात शेती आहे. मात्र पाण्याची सोय नसल्याने पावसावर पिके घेऊन झाली की कामासाठी परिवारासोबत इथे येतो. या भागात स्थानिक मजुरीपेक्षा चांगले पैसे मिळतात. येथील शेतकरी काळजी घेतात. आता कांदा, आले काढणी ही कामे शिकून घेतली आहेत.
गिरधन सोलंकी, शेतमजूर, अंजनगाव, ता. सेंधवा, जि. बडवाणी
स्थानिक शेतमजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नुकसान होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मजुरी द्यावी लागते. तुलनेत परप्रांतीय मजूर वेळेवर येतात. त्यांचा मजुरी दर तुलनेत कमी आहे.
तुकाराम आरगडे, शेतकरी, देशमाने, ता. येवला, जि. नाशिक
कांदा, आले काढणी, मिरची तोडणी ही कामे त्यांच्यासाठी नवी होती. मात्र आता शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांनी कामात कौशल्य मिळवले आहे. शेतकरी स्वतःच्या वाहनातून त्यांची ने-आण करतात.
नितीन सोनवणे, शेतकरी, जळगाव नेऊर, ता. येवला, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT