Jalgaon News Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

बहाळ व लगतच्या भागात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे हल्ले सुरूच होते. बिबट्याने गिरणा परिसरात धुमाकूळ घातला होता.

Team Agrowon

Jalgaon News:

मेहुणबारे, जि.जळगाव ः चाळीसगाव तालुक्यात व लगत गिरणा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पशुसंहार करणारा नर जातीचा बिबट्या (Leopard) सापडला आहे. बहाळ (ता.चाळीसगाव) येथील प्रभाकर शेवरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात तो अडकला.

बहाळ व लगतच्या भागात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे हल्ले (Leopard Attack) सुरूच होते. बिबट्याने गिरणा परिसरात धुमाकूळ (Leopard Terror) घातला होता.

येथील भागात आदल्या दिवशी गोऱ्हा ठार केला होता. वन विभागाने ज्या शेतात दोन पिंजरे ठेवले होते, त्या पिंजऱ्यात दररोज अदलून बदलून खाद्य ठेवले जात होते.

...अन् अडकला बिबट्या

एक महिन्यात बिबट्याने १५ जनावरे फस्त केले. वन विभागाने बहाळ व लगत पिंजरे बसवले होते, तसेच या बिबट प्राण्याच्या हालचाली ओळखण्यासाठी पाच ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते.

पिंजऱ्यात ठेवलेले भक्ष खाण्यासाठी बिबट्या पुन्हा रात्री तेथे आला व पिंजऱ्यात असलेल्या खाद्य खाण्यासाठी गेला अन् पिंजऱ्यात अडकला.

वन विभागाची कामगिरी

बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी संदीप भट यांनी वैद्यकीय तपासणी केली. बिबट्याला पकडण्यासाठी धुळे येथील वनसंरक्षक दि. वा. पगार, जळगाव येथील उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक (जळगाव) सुदर्शन शिसव यांनी मार्गदर्शन केले.

वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, विवेक देसाई, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे वनपाल आर. व्ही. चौरे, वनरक्षक जी. एस. पिंजारी, चंद्रशेखर पाटील, अश्विनी ठाकरे, राहुल पाटील, काळू पवार, महेंद्र शिंदे, रवी पवार, यांनी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मदत केली.

बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात

गिरणा परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, एक गेला की दुसरा लगेचच येतो. त्यामुळे आता पुन्हा नवीन बिबट्या सक्रिय होतो की काय0 असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पकडलेल्या बिबट्याच्या सुरक्षेसंदर्भात वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही झाली. पकडल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Decision: शेतकरी कर्जमाफीवर सरकार लवकरच निर्णय घेणार; बावनकुळेंची माहिती

Fruit Market: गुणकारी आवळ्याला ग्राहकांची मागणी वाढली

Rabi Sowing: धुळे जिल्ह्यात २३ टक्क्यांवर रब्बी पेरणी

Agricultural Import Policy: आयात धोरण शेतकरी, ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने समतोल हवे- कृषिमंत्री चौहान

Rabi Crop Competition: रब्बी हंगाम स्पर्धेसाठी अर्ज करा

SCROLL FOR NEXT