Leopard Attack : टेंभोली गावात बिबट्याचा वावर?

बैलावर वाघाने हल्ला चढवला त्या वेळी अशोक सातपुते हे प्रत्यक्ष तिथे हजर असल्याने वाघच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Leopard Attack in Palghar
Leopard Attack in PalgharAgrowon

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील टेंभोली गावालगत जंगल भरपूर प्रमाणात आहे. या जंगलात काही दिवसांपूर्वी बिबट्याने येथील बैल मालक अशोक देवजी सातपुते यांच्या अडीच वर्षांच्या बैलावर हल्ला (Leopard attack) केला.

त्यात बैल गंभीर जखमी झाला आहे. पण हा बिबट्या (Leopard) नसून तो वाघ (Tiger) असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या भागात वाघाचा वावर नसल्याचा दावा वन विभागाकडून (Forest Department) करण्यात आला आहे. तसेच याबाबत सातपुते यांनी विक्रमगडच्या वनक्षेत्रपालांकडे योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी पत्र दिले आहे.

टेंभोली गावात अशोक सातपुते हे आपला बैल घेऊन गावापासून एक किलोमीटर अंतर असलेल्या जंगलातील ओव्हळावर पाणी पाजण्याकरीता गेले होते.

तेथून घरी परतत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी सातपुते यांनी आरडाओरड केल्याने इतर ग्रामस्थ धावत आले, तसेच आजूबाजूला असलेली इतर गुरे देखील बिबट्यावर धावत गेली.

यामुळे त्याने तेथून पळ काढला. पण हा वाघ असल्याचा दावा सातपुते यांनी केला आहे. बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे वन विभागाने येथे योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वाघ की बिबट्या?

बैलावर वाघाने हल्ला चढवला त्या वेळी अशोक सातपुते हे प्रत्यक्ष तिथे हजर असल्याने वाघच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मात्र वन खात्यातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या भागात वाघाचा वावर नसून तो बिबट्या असण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी शक्यता वर्तवली आहे.

Leopard Attack in Palghar
Leopard in Chandrapur: राजुरा वनपरीक्षेत्रात बिबट्या जेरबंद
वाघाने बैलावर हल्ला केला, ते दृश्य मी समक्ष पाहिले आहे. येथे वाघ असल्याचे निश्चित आहे.
अशोक देवजी सातपुते, टेंभोली, विक्रमगड
विक्रमगड भागात वाघ दिसत नाही. त्यामुळे हल्ला करणारा प्राणी बिबट्याच असू शकतो. आमचे पथक जागेवर जाऊन पाहाणी करणार आहे.
एन. व्ही. शिंदे, वनक्षेत्रपाल, विक्रमगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com