Leopard  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे भुसावळातील कंडारीत भीतीचे वातावरण

Leopard Sighting : निर्जन ठिकाणी असणाऱ्या बिबट्यांनी आता भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे मोर्चा वळविल्याच्या घटनांमध्ये वाढही होत असल्याचे चित्र आता भुसावळ परिसरात निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Bhusawal News : शहरालगत तापी नदीच्या काठावरील कंडारी व आयुध निर्माणी वसाहतमधील काही भागात गेल्या महिन्यात नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले होते. या घटनेकडे दुर्लक्ष होताच रविवारी (ता. २) रात्री गाढवाची शिकार केल्याचे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून बिबट्याच्या पावलांचा शोध घेतला. मात्र ठसे दिसून आले नाही. त्यामुळे गाढवाची शिकार कोणत्या तरी हिंस्र प्राण्यांनी केली असावी, असा अंदाज वनकर्मचाऱ्यांचा आहे. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

निर्जन ठिकाणी असणाऱ्या बिबट्यांनी आता भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे मोर्चा वळविल्याच्या घटनांमध्ये वाढही होत असल्याचे चित्र आता भुसावळ परिसरात निर्माण झाले आहे. भुसावळ शहराला लागून तापी नदी काठावरील कंडारी व भुसावळ आयुध निर्माणी वसाहतमध्ये बिबट्याचे गेल्या महिन्यात बहुसंख्य नागरिकांना दर्शन झाले होते.

त्यावेळी नागरीकांनी वन विभागाला सांगून कर्मचाऱ्यांनी त्या परिसराची पाहणी केली होती. मात्र त्यावेळी बिबट्याचा शोध घेत त्याच्या पायाचे ठसेही मिळून न आल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या नसल्याचे सांगितले होते.

या घटनेकडे दुर्लक्ष होत असतानाच याच परिसरात रेल्वे क्षेत्रातील केंद्रीय विद्यालयाच्या सुरक्षा भिंतीशेजारी रविवारी (ता. २) रात्री एका गाढवाची शिकार केल्याचे सोमवारी (ता. ३) सकाळी नागरिकांना दिसून आले होते.

नागरिकांनी पुन्हा वन विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून माहिती सांगितली. त्यावेळी गाढवाची शिकार झालेल्या घटनेचा पंचनामा करून वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ठसे किंवा शिकार बिबट्यानेच केली, असे पुरावे मिळून आले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT