
Solapur News : वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे धाराशिव जिल्हा आणि बार्शी तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये, चोराखळी (ता. धाराशिव) येथे एका बैलावर झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागाने त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते.
वाघ पुन्हा त्या ठिकाणी येईल, अशी वनविभागाची अपेक्षा होती. मात्र, या कॅमेऱ्यांमध्ये वाघाऐवजी बिबट्याचे अस्तित्व आढळून आले. त्यामुळे रेस्क्यू पथकाला अपेक्षित यश मिळाल्याचे दिसून येत नाही.
भानसळे (ता. बार्शी) आणि चोराखळी (ता. धाराशिव) परिसरात दोन दिवस वाघाचे सतत हल्ले झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसाठी महत्त्वाचे असलेले बैल या हल्ल्यांमध्ये बळी पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बार्शी तालुक्यात तसेच धाराशिव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वाघाने वारंवार हल्ले करून पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोराखळी येथील हल्ल्यानंतर वाघ येडशी अभयारण्यात गेला असावा, असा वनविभागाचा अंदाज होता. त्यामुळे पुणे रेस्क्यू पथक व वनविभागाने अभयारण्य क्षेत्र तपासून वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या मोहिमेत त्यांना यश आले नाही.वाघ अत्यंत चतुर आणि सावध प्राणी असल्याने ज्या ठिकाणी तो शिकार करतो, तिथे पुन्हा फिरकत नाही, असे उक्कडगाव आणि चोराखळी येथे झालेल्या हल्ल्यांवरून सिद्ध होत आहे. वनविभाग व रेस्क्यू पथक पूर्ण दक्षतेने तपास करत असले तरी, वाघाचा अचूक माग काढणे कठीण जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.