Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : सोलापुरात चार तालुक्यांच्या सीमाभागात बिबट्याचा वावर वाढला ; नरखेड परिसरात घबराट

माढा, मोहोळ, बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Agrowon

Mohol News : मोहोळ ः भैरववाडी (ता. मोहोळ) शिवारात गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेसात वाजता शेतात जाण्यासाठी मोटरसायकलवरून निघालो होतो, ओढ्याजवळ ज्वारीच्या पिकातून शेतातील बांधाच्या दिशेने बिबट्या गेल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी रंगनाथ मोरे यांनी सांगितले. त्यामुळे माढा, मोहोळ, बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

बुद्रूकवाडी (ता.माढा) शिवारातील बबन सावंत यांच्या द्राक्षाच्या बागेतून बुधवारी धानोरे शिवारात बिबट्या जाताना दिसला होता. भैरववाडी व बुद्रुकवाडी या गावांचे शिवार हा चार तालुक्याच्या सीमावर्ती भागालगतच आहे. भैरववाडीत वनरक्षक शुभांगी कोरे यांनी भेट दिली, रंगनाथ मोरे यांनी घटनास्थळी बिबट्याचे ठसे दाखवले.  

शेतकऱ्याने सांगितलेले वर्णन व ठसे तपासणीनंतर वनरक्षक शुभांगी कोरे यांनी हा बिबट्याच असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी स्वतः व पशुधनाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
बिबट्या दिसल्याने या परिसरात रात्री गस्त सुरू करण्यात येईल. तसेच वेळप्रसंगी पिंजरा लावण्यात येईल मात्र,  शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे वनरक्षक श्रीमती मोरे यांनी सांगितले.

यावेळी घटनास्थळी मोहोळ व माढा तालुक्यातील सीमावर्ती परिसरातील पन्नासहून अधिक शेतकरी उपस्थित होते.
अशी घ्यावी शेतकऱ्यांनी काळजी
  शिवारात जाताना समूहाने शेतात जावे
 रात्रीच्या वेळी हातात बॅटरी, काठ्या बाळगा.

वळ असलेल्या मोबाईलचा टॉर्चर लावून गाणी मोठ्या आवाजात वाजवा.
 वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी त्वरित संपर्क साधा.
 शेतात किंवा वस्तीवर पशुधन उघड्यावर बांधू नका.
 वस्तीवर महिला व लहान मुलांना एकटे सोडू नका
भैरववाडी (ता. मोहोळ) शिवारातील ओढ्याच्या परिसरात घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्या वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे व शेतकऱ्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार तो बिबट्याच आहे. नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाशी संपर्क साधावा.
- शुभांगी कोरे, वनरक्षक, मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना अडवू

Sugarcane Price Cut: प्रतिटनामागे १५ रुपयांची कपात...! 'हा तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा', राजू शेट्टींचा आरोप, रोहित पवारांचाही सरकारवर हल्लाबोल

Agriculture Research: सहजीवी जिवाणूंमध्ये प्रथमच आढळली वैशिष्ट्यपूर्ण संरचना

Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच 

Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

SCROLL FOR NEXT