Leopard Attack agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : पन्हाळा तालुक्यात बिबट्याचा वावर, जनावरांवर हल्ले सुरूच

Leopard : बिबट्या अधिक दिवस तेथे वास्तव्यास असल्यास त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.

sandeep Shirguppe

Leopard In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट निर्माण झाले आहे. पन्हाळा तालुक्यातील साळवाडी येथील संभाजी गणपती घाटबांधे यांच्या गोठ्यात असणाऱ्या रेडकावर बिबट्याने काल(ता.१७) पहाटे चारच्या सुमारास हल्ला केला. यामध्ये रेडकाचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसांपासून कुंभारवाडी येथील शिवारात असणाऱ्या बिबट्याने आपला मोर्चा साळवाडी येथे वळविला आहे. संभाजी घाटबांधे यांच्यासह अन्य ग्रामस्थांची गायरानमध्ये घरे व जनावरांचे गोठे आहेत. घाटबांधे यांच्या घरासमोर असणाऱ्या या गोठ्यात एक म्हैस, एक गाय व एक वर्षाची रेडी अशी जनावरे आहेत.

सहाच्या सुमारास गोठ्यात गेले असता रेडकू दिसले नाही. अन्यत्र शोध घेतला असता रक्त पडलेले दिसले. शेजाऱ्यांना बोलावून पाहणी केली असता ते रेडकू दोनशे फुटांपर्यंत ओढत नेत भगवान म्हामुलकर यांच्या उंच गवतात अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत दिसून आले.

याबाबत वन विभागाला कळवण्यात आले. वनपाल नाथा पाटील, वनरक्षक स्वप्नील काशीद, वनमजूर निवृत्ती चौधरी, राजन भंडारी, किरण कुंभार, संभाजी चौगले यांनी पाहणी करून नुकसान भरपाईबाबत पंचनामा केला. तो प्राणी बिबट्याच असल्याचा दुजोरा त्यांनी दिला आहे.

ट्रॅप कॅमेरा लावून शोध

बिबट्याने रेडकू अर्धवट खाऊन टाकलेल्या ठिकाणी रात्री ट्रॅप कॅमेरा लावणार असल्याचे वनविभागाने सांगितले. बिबट्या अधिक दिवस तेथे वास्तव्यास असल्यास त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.

नशीब बलवत्तर म्हणून...

साळवाडी शिवारात गव्यांकडून पिके फस्त केली जात असल्याने शेतकरी राखणीला जातात. बिबट्याने ठार केलेले रेडकू ज्या ठिकाणी खाल्ले, तेथेच काही अंतरावर साळवाडीचे सरपंच भगवान म्हामुलकर आपल्या शेतात मचाणावर राखणीला होते. रात्रभर जागल्याने त्यांना पहाटेची गाढ झोप लागली होती. नशीब बलवत्तर म्हणून बिबट्या काही अंतरावरून परत फिरला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT