Leopard Attack Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack Kolhapur : कोल्हापुरात बिबट्यांचे हल्ले वाढले, चिमुकली झाली आता शेतकऱ्यांची मेंढ्यांवर हल्ला

sandeep Shirguppe

Leopard Attack Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या काही महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या सुरक्षेविषयी आता चिंता व्यक्त केली जात आहे. मागच्या १५ दिवसांपूर्वी एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता १० मेंढ्या बिबट्याने ठार केल्याची माहिती समोर येत आहे.

शाहुवाडी तालुक्यातील सावे येथे शेतात बसवण्यात आलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दहा मेंढ्या ठार झाल्या. काल (ता.१४) दुपारी चारच्या दरम्यान घटना घडली. ईश्वरा आण्णा वग्रे (रा. सोनवडे ता. शाहूवाडी) यांच्या मालकीच्या मेंढ्या आहेत.

घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत हल्यात ठार झालेल्या मेंढ्याचा पंचनामा सुरू होता. सकाळी मेंढपाळ वो मेंढयांना घेऊन चारण्यासाठी अन्य ठिकाणी गेले. त्यावेळी त्यांनी लहान मेंढयांना सावतील शेतात जाळ्यांमध्ये बंद करुन ठेवले होते. दुपारी बिबट्याने हल्ला केला.

हल्ल्यात दहा मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी मेंढ्यांना घेऊन व्रगे मूळ ठिकाणी परतले तेव्हा त्यांना पिंजऱ्यातील मेंढ्यांवर हल्ला झाल्याचे दिसले, समोर मृत झालेल्या दहा मेंढया पाहून वग्रे यांना धक्का बसला. घटनेची माहती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गदर्दी केली. याची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली.

मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आशिष भोसले यांच्यासह वनसेवक शंकर लव्हटे, रामचंद्र केसरे, जयसिंग पाटील दाखल झाले, विवट्याने हल्ला केलेल्या परिसरात तत्काळ दोन ट्रॅप कॅमेरे लावून खबरदारी घेतली आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मृत मेंढ्यांचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच मृत मेंढ्यांच्या नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल. ग्रामस्थांनी रात्री बाहेर पडताना खबरदारी घ्यावी. एकटे बाहेर पडू नये, जनावरे, मेंढ्या, शेळी, कुत्रे यांना संरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

E-Peek Pahani : ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

SCROLL FOR NEXT