Jalgaon News : आई आणि तिच्या बाळाचे अतूट नाते असून, त्याला वन्यप्राणी देखील अपवाद ठरत नाही. आपल्या पिलांपासून ताटातूट झाल्यानंतर बिबट्यासारखे प्राणी अस्वस्थ होतात. प्रसंगी ते अधिक हिंस्र देखील होऊ शकतात.
गेल्या दोन वर्षांत जंगल परिसरात आपल्या आईसोबत फिरताना ताटातूट झालेल्या अशाच सुमारे १३ बछड्यांना त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांना यश आले आहे.
चाळीसगाव तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर जंगल होते. त्यामुळे जंगली श्वापदांचा अधिवास मोठा होता. कालांतराने वाढती लोकसंख्या, जंगलतोड व जंगलातील अतिक्रमणांमुळे वन्यप्राण्यांना पुरेशा प्रमाणात जागाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तींमध्ये दाखल होत असल्याचे दिसून येतात. यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.
विशेषतः गिरणा नदीकाठच्या परिसरात पाणी असल्याने या भागात सुरवातीपासूनच बिबट्या आढळून येतात. या भागात आपल्या आईपासून ताटातूट झालेली बिबट्याची पिले अनेकदा शेतांमध्ये आढळून आली आहेत. दोन वर्षांत तब्बल १३ पिलांची त्यांच्या आईसोबत येथील वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी भेट घडवून आणली आहे.
बिबट्या हा प्राणी सहसा दिवसा न फिरता, रात्रीच्या सुमारास फिरतो. आपल्या घराजवळ राहून बिबट्या आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना काही दुखापत होत असेल तर किंवा त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप होत असेल तर बिबट स्वतःच्या रक्षणासाठीच हल्ला करतो.
तिसऱ्यांदा घडवून आणली भेट
बहाळ (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र महाजन यांच्या शेतात नुकतीच ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना बिबटची दोन पिले आढळून आली होती. यापूर्वी देखील याच पिलांना वन विभागाने दोन वेळा त्यांच्या आईची भेट घडवून आणली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.