Raigad Zilla Parishad Agrowon
ॲग्रो विशेष

Raigad ZP : प्रदीर्घ प्रशासकीय कारभार

Administrative Affairs : रायगड जिल्हा परिषदेची मुदत संपून २४ महिने पूर्ण झाले असून तेव्हापासून जिल्हात प्रशासकीय कारभार सुरू आहे.

Team Agrowon

Alibaug News : रायगड जिल्हा परिषदेची मुदत संपून २४ महिने पूर्ण झाले असून तेव्हापासून जिल्हात प्रशासकीय कारभार सुरू आहे. लोकल बोर्ड बरखास्त होऊन स्थापन झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मागील ६० वर्ष इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ कालावधीचा प्रशासकीय कारभार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक केव्हा लागेल, याबाबत अद्यापही अनिश्चितता असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

३३ वर्षापूर्वी २२ महिन्याची प्रशासकीय राजवट लावण्यात आली होती. हा विक्रम मोडीत निघाला. सध्याच्या प्रशासकीय राजवटीला २४ महिने होऊन गेले. प्रभाकर पाटील यांच्या सलग ११ वर्षाच्या अध्यक्ष पदानंतर १ जून १९९० रोजी सुरु झालेला प्रशासकीय २० मार्च १९९२ रोजी संपला होता. २० मार्च सुनील तटकरे यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.

त्यानंतर नियमीत निवडणुका होत गेल्या; मात्र, दोन वर्षांपूर्वी योगिता पारधी यांचा २० मार्च रोजी अध्यक्षपदाचा कालावधी संपल्यापासून रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कारभार सुरु आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यावर कारभाराची जबाबदारी होती. त्यांची बदली होऊन भारत बास्टेवाड यांच्याकडे ही जबाबदारी आली. ती आजपर्यंत तशीच सुरु आहे.

इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत कारभार सुरु आहे. तब्बल दोन वर्षाचा कालावधी अनुभवलेला नसल्याने जिल्हा परिषदेसह, पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणुका लांबल्‍या

प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर मंत्रालय स्तरावर अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येते. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालेले आहे; मात्र, ओबीसींच्या आरक्षणामुळे प्रभाग रचना निश्चित होऊ शकलेली नाही.

पंचायत समितीतही हीच स्थिती

निवडणुका लांबल्याने रायगड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १५ पंचायत समित्या, ८ नगरपालिकांमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे. कर्जत सोडून उरण, पेण, अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, खोपोली, माथेरान या नगरपरिषदांचा कालावधी संपला आहे. तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी कारभार हाकत आहेत, तर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्या बरखास्त झालेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT