Pomegranate Production Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Production : गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन शिकावे महाराष्ट्राकडूनच

Team Agrowon

Maharashtra Pomegranate Production : पुणे ः ‘महाराष्ट्रातील डाळिंब बागायतदार ज्ञानी व प्रगत आहेत. गुणवत्तापूर्ण डाळिंब कसे पिकवावे हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे.

त्यांच्या मार्गदर्शनातूनच निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाला (Pomegranate Production) चालना मिळून राजस्थानी शेतकऱ्याला देश- परदेशातील बाजारपेठ मिळवण्यासाठी योग्य दिशा मिळेल, असे गौरवौदगार जोधपूरहून प्रवासाचा मोठा पल्ला पार करून महाराष्ट्रातील डाळिंब शेती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या राजस्थानातील वीस शेतकऱ्यांच्या समुहाने काढले.

राजस्थानात दहा वर्षांपासून विशेषतः बाडमेर, जालोर, सिरोही व जोधपूर या पट्ट्यात डाळिंब क्षेत्र विकसित होत असून आजमितीला २० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन घेऊन देश- परदेशातील बाजारपेठ मिळवण्याची या शेतकऱ्यांची धडपड आहे.

मात्र शास्त्रीय, तंत्रशुद्ध व्यवस्थापन व मालाच्या गुणवत्तेबाबत अद्याप त्यांच्याकडे पुरेशा ज्ञानाचा अभाव आहे. त्याच अनुषंगाने राजस्थानातील वीस निवडक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील डाळिंब शेतीचा अभ्यास दौरा ‘अनार शोध यात्रा’ या नावाने नुकताच केला.

नाबार्ड तसेच जोधपूर येथील ‘साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर’ (एसएबीसी) या संस्थेने त्यासाठी सहकार्य केले. ‘एसएबीसी’ चे संस्थापक संचालक डॉ. भगिरथ चौधरी यांचाही दौऱ्यात सहभाग होता.

दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र, बारामती, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, (एनआरसी) तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रगतिशील डाळिंब उत्पादकांच्या बागा, निविष्ठा क्षेत्रातील कंपन्या आदींना भेटी दिल्या.

आपले अनुभव सांगताना शेतकरी म्हणाले की राजस्थानात चार हजार ते पाच हजारांपर्यंत रोपांची लागवड करणारे शेतकरी आहेत.

आमच्याकडे पाऊस खूप कमी पडतो. तापमान खूप असते. तेलकट डाग रोगाची समस्या नाही.

मात्र फळांचा आकार खूप लहान असून ‘ए’ ग्रेड फळांचे प्रमाण खूप कमी असते. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांच्या बागांना भेटी दिल्या त्यांचे व्यवस्थापन वाखाणण्याजोगे वाटले. ज्ञान, अभ्यास व तंत्रज्ञान वापरात ते खूप प्रगत असल्याचे जाणवले.

गुटी व उती संवर्धित रोपे, छाटणीचे महत्त्व, तंत्र, प्रतिझाड किती फळे ठेवावी, पाणी केव्हा, किती अंतराने व मुळांच्या किती कक्षेत द्यावे, अन्नद्रव्ये व बहार व्यवस्थापन आदी अनेक महत्त्वपूर्ण व नव्या बाबीं त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या.

अशा मार्गदर्शनातूनच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येऊन राजस्थानातील डाळिंब शेती प्रगतावस्थेकडे आगेकूच करेल, अशा प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

‘एनआरसी’ मधील सात ते आठ शास्त्रज्ञांची भेट, तेथील डाळिंब ज्यूस निर्मिती, बारामती केव्हीकेमधील इंडो डच प्रकल्प हे अनुभवही उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

डाळिंब दाणे निर्यातीचे प्रयत्न
खासगी डाळिंब प्रक्रिया युनिटच्या भेटीत ‘ग्रेडिंग’, ‘क्लिनिंग’, दाणे वेगळे करणे, पॅकिंग आदी कार्यपद्धती जवळून पाहिली. एसएबीसी संस्थेचे डॉ. भगीरथ चौधरी म्हणाले, ‘‘भारतातून अमेरिका व कॅनडात ‘अनारदान्याची’ निर्यात होते.

राजस्थानातील डाळिंब ‘रेसिड्यू फ्री’ आहे. आमच्या वातावरणात येणाऱ्या डाळिंबात गोडी आहे. दाण्यातील बी मऊ असते. रंगही छान आहे. ही संधी साधून अनारदाना निर्यातीचे आमचे प्रयत्न आहेत.’’

राजस्थानातील शिवकिसान शेतकरी उत्पादक कंपनीचे समन्वयक म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील कंपनीला मागील वर्षी ३०० टन डाळिंब आम्ही याच कारणासाठी पुरवले. त्यांच्यासोबत व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे.’’

‘महाराष्ट्राप्रमाणे बाजारपेठ व्हावी’
महाराष्ट्रात डाळिंब विक्रीची ‘सिस्टीम’ आहे. सशक्त बाजारपेठा आहेत. राजस्थानात त्यांचा अभाव आहे.

तेथे हंगामात व्यापारी डाळिंब पट्ट्यात येऊन रस्त्याकडेला खरेदीचे स्टॉल उभारतात. मनाप्रमाणे दर ठरवून खरेदी करतात. हंगाम संपला की ते गायब होतात, अशी व्यथाही राजस्थानातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT