Kolhapur Kalammawadi Dam agrowon
ॲग्रो विशेष

Kalammawadi Dam Leackage : काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीसाठी अडचण: पाणीसाठ्याचा अडसर

Kalammawadi Dam Water Storage : काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना काम सुरू करण्याची सज्जता झाली. मात्र, काम सुरू करण्यामध्ये धरणातील अधिक पाणीसाठ्याचा अडसर कायम आहे.

Team Agrowon

Kolhapur News : काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना काम सुरू करण्याची सज्जता झाली. मात्र, काम सुरू करण्यामध्ये धरणातील अधिक पाणीसाठ्याचा अडसर कायम आहे. त्यातून काम आणखी आठवडाभर लांबणीवर पडले आहे. आता गळती थोपविण्यासाठी धरणाच्या पाणीपातळीत अपेक्षित प्रमाणात घट होण्याकडे जलसंपदा विभागाच्या यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

सध्या धरणातील पाणीपातळी ६३९.८३ मीटर आहे. पाणी पातळी किमान अर्ध्या मीटरने कमी झाल्यानंतरच प्रत्यक्ष गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम सुरू करणे शक्य होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

पाणीपातळीत नैसर्गिकरीत्या घट होण्यास आणखी आठवडाभराच काळ जाईल. त्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात धरणाच्या मुख्य भिंतीत ग्राउंटिंगसाठी विवरे घेण्याचे प्राथमिक टप्प्यातील काम सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी सक्षम यंत्रणेकडून गळतीची पुन्हा पाहणी केली जाऊन कामाचे नियोजन आखणीचे निर्देश गळती प्रतिबंधक उपाययोजना प्रस्ताव मंजुरीच्या प्रशासकीय अध्यादेशात दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने दोन आठवड्यांपूर्वी धरणस्थळाला भेट देऊन गळतीची पुन्हा पाहणीही केली. उपाययोजना कामाच्या अनुषंगाने यंत्रणेला मार्गदर्शन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला.

आगामी आठवडाभरात पाणीपातळीत घट होईल, त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात अडसर राहणार नाही. प्राथमिक टप्प्यातील काम सुरू होण्यास आता अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही, असा दावाही सूत्रांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT