Groundnut Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Crop Disease: भुईमूग पिकातील ‘पानावरील टिक्का रोग’

Groundnut Crop: आजच्या लेखात पानांवरील टिक्का म्हणजेच ‘पानावरील ठिपका’ रोगाविषयी माहिती घेऊ.

Team Agrowon

राहुल वडघुले

Groundnut Crop Disease Information: भुईमूग हे पीक हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकामध्ये टिक्का, तांबेरा, ॲन्थ्रॅकनोज, मर रोग, जिवाणूजन्य मर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. आजच्या लेखात पानांवरील टिक्का म्हणजेच ‘पानावरील ठिपका’ रोगाविषयी माहिती घेऊ.

लक्षणे

पीक २० ते ३० दिवसांचे असताना रोगाची लक्षणे पाने व फांदीवर दिसून येतात.

सुरुवातीला तपकिरी रंगाचे गोल किंवा अंडाकार ठिपके खालील पानांवर दिसू लागतात. या ठिपक्यांच्या भोवती पिवळी कडा दिसून येते. नंतर हे ठिपके काळसर रंगाचे होतात.

ठिपक्यांच्या मागील बाजूला पाहिल्यास काळसर रंगाची लहान वर्तुळाकार ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके पानाच्या देठावर देखील दिसून येतात.

रोगाच्या प्रादुर्भावामुळे खालील पाने गळून जातात.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : टिक्का रोग (पानावरील ठिपका)

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

बुरशीचे फायलम (डिव्हिजन) : Ascomycota

रोगकारक बुरशीचे शास्त्रीय नाव ः सरकोस्पोरा परसोनॅटा (Cercospora personata).

आढळ : सर्व भुईमूग उत्पादक भागांमध्ये प्रादुर्भाव आढळून येतो.

नुकसान : या रोगामुळे पिकाचे २२ टक्के पर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.

यजमान पिके : आपल्याकडे फक्त भुईमूग पिकावरच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

रोग कसा निर्माण होतो

या रोगाचे बीजाणू मागील वर्षीच्या किंवा जुन्या पानांवर, फांद्यांवर, बियाण्यावर सुप्त अवस्थेत असतात. हे बीजाणू नवीन पिकावर वाऱ्यामार्फत जातात. हवेतील आर्द्रता ८० ते ९० टक्के आणि तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस अशी हवामान स्थिती तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास पानावर पडलेले बीजाणू अंकुरित होऊन रोगाची लागण करतात.

लागण झाल्यानंतर २ ते ३ दिवसांनी लक्षणे दिसून येतात. रोगामुळे तयार झालेल्या ठिपक्यांमध्ये पानाच्या मागील बाजूने अनेक गर्द काळ्या रंगाच्या बीजाणूधानी (Conidiophore) तयार होतात. या बीजाणूधानीमध्ये बुरशीचे बीजाणू (Conidia) तयार होतात. हे बीजाणू रोगाचा पुढील प्रसार करतात. याला दुय्यम लागण असे म्हणतात.

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे बीजाणू अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. हे बीजाणू दंड गोलाकार व लांब असतात. त्यांचा खालचा भाग (Base) मोठा गोलाकार व पुढे निमुळता होत गेलेला दिसतो. या बीजाणूमध्ये २ ते ४ सेप्टा दिसून येतात. त्यांचा रंग पारदर्शक ते फिक्कट पिवळा असतो.

नियंत्रणाचे उपाय

अगोदरचे पीक भुईमूग नसावे. पीक फेरपालट करावी.

लागवडीसाठी रोगमुक्त रोगप्रतिकारक्षमता असलेल्या बियाण्याची निवड करावी.

लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी.

पिकाची पाने ओली असताना पिकामध्ये कोणतीही कामे करू नयेत.

रोगग्रस्त पाने काढून टाकावीत.

वेळीच तणनियंत्रण करावे.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.

शिफारस केलेली बुरशीनाशके (लेबल क्लेमयुक्त)

ॲझोक्सिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी) (संयुक्त बुरशीनाशक)

क्लोरोथॅलोनील (४० टक्के डब्ल्यू/डब्ल्यू) अधिक डायफेनोकोनॅझोल (४ डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

क्लोरोथॅलोनील (७५ टक्के डब्ल्यूपी)

हेक्झाकोनॅझोल (५ टक्के इसी)

सल्फर (४० टक्के एससी)

कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्ल्यूपी)

मेटिराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रोबीन (५ टक्के डब्ल्यूजी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT