Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग विरोधात महायुतीचे नेते एकवटले, मुख्यमंत्र्यांची दिलं निवेदन

Kolhapur Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १ हजार २०० हेक्टर जमीन या महामार्गासाठी जाणार असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway Kolhapur : राज्यातील शक्तिपीठांना जोडण्यासाठी गोवा ते नागपूर असा शक्तिपीठ महामार्ग बांधण्यासाठी काल अधिसूचना काढण्यात आल्याने शेतकऱ्यांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान याविरोधात महाविकास आघाडीचे नेते पहिल्यापासून आक्रमक होते आता कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्याही नेत्यांनी याला जोरदार विरोध दर्शवला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, भाजप नेते समरजित घाटगे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रदद करण्याची मागणी माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यावेळी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १ हजार २०० हेक्टर जमीन या महामार्गासाठी जाणार असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत. या शेतकऱ्यांच्या अल्प प्रमाणात असणाऱ्या जमिनी शक्तिपीठ महामार्गामध्ये गेल्यास शेतकऱ्यांना उपजिवीकेसाठी जमिन शिल्लक राहणार नाही, त्यामुळे शेकऱ्यांमध्ये या शक्तिपीठ महामार्गा प्रचंड विरोध दर्शविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता हा महामार्ग तत्काळ रद्द करणे गरजेचं असल्याचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांना देण्यात आल्याची माहिती दिली.

१८ जूनला भव्य मोर्चा

18 जून रोजी कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चा होणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी संघर्ष समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन सभा घेत आहेत. याकरिता प्रबोधनासाठी माहितीपत्रके वाटली जात आहेत. गावागावातील कृती समित्या एकेक शेतकऱ्याला भेटून मोर्चात येण्याचे आवाहन करत आहे.

जिल्हा समितीकडून भितीपत्रके टू व्हीलरवर लावण्याचे स्टिकर फोर व्हीलरवर लावण्याची स्टिकर वाटले जात आहेत. बहुतांश गावांमध्ये मोर्चाचे डिजिटल फलक देखील लागत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाचे दोष हे शेतकरी व सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवले जात असल्याची माहिती कृती समितीचे गिरीष फोंडे यांनी दिली.

तालुकानिहाय 'या' गावांना अधिसूचना

शिरोळ - कोथळी, दानोळी, निमशिरगाव, तारदाळ

हातकणंगले - तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली, तारदाळ

करवीर - सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, वडगाव खेबवडे

कागल - कागल, व्हनूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, सोनाळी कुरणी, निढोरी, व्हनगुत्ती

भुदरगड - आदमापूर, वाघापूर, मडिलगे बुद्रुक, कूर, मडिलगे खूर्द निळपण, धारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, देवर्डे, कारिवडे

आजरा - दाभिल, शेळप, पारपोली, आंबाडे, सुळेरान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT