Farmer Issue
Farmer IssueAgrowon

Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा

Farmer Demand : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी मराठवाड्यातील काळी कसदार, सुपीक, बागायती जमीन संपादित करून शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट घातला आहे.

Parbhani News : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी मराठवाड्यातील काळी कसदार, सुपीक, बागायती जमीन संपादित करून शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट घातला आहे.

हा महामार्ग शेती व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी पोखर्णी नृसिंह (ता.परभणी) येथे रविवारी (ता.२) पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली.

Farmer Issue
Shaktipeeth Highway : साहेब पिढीजात टिकवलेली जमीन वाचवा, पालकमंत्री मुश्रीफांना शेतकऱ्यांचे निवेदन

परभणी जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ३१ गावांच्या शिवारातून प्रस्तावित या महामार्गाची लांबी ७१ किलोमीटर आहे.

Farmer Issue
Shaktipeeth Highway : 'शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या य महामार्गविरोधी लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणार'

या जिल्ह्यातील सुमारे ७३३ हेक्टर जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. भूसंपादन केल्यानंतर शेतकरी उद्धवस्त होणार आहेत. पर्यायी रस्ते असताना या महामार्गाची गरज नसल्यामुळे तो रद्द करावा,

अशी मागणी गोविंद घाटोळ, माणिकराव गरुड, अॅड. गजेंद्र येळकर, विजय बेले, दत्ता वाघ आदींसह उपस्थित बाधित शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com