Bird Flu : भारतात ४ वर्षाच्या मुलाला बर्ड फ्लूची लागण; जागतिक आरोग्य संघटनेची पुष्टी

Human Cases Of Bird Flu : भारतात एच९एन२ प्रकारातील बर्ड फ्लूचा दुसरा रूग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याच्या आधी २०१९मध्ये अशी रूग्णाची नोंद झाली होती.
Bird Flu
Bird FluAgrowon
Published on
Updated on

Pune News : जागतिक आरोग्य संघटनेने मानवात बर्ड फ्लूच्या संसर्गाची पुष्टी केली आहे. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी सांगितले की, पश्चिम बंगाल राज्यात एका चार वर्षाच्या मुलामध्ये एच९एन२ विषाणूमुळे बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार डब्ल्यूएचओने सांगितले की, रुग्णामध्ये गंभीर श्वसन समस्या, उच्च ताप आणि पोटातील त्रासामुळे स्थानिक रुग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. त्याला तीन महिन्यांच्या उपचारानंतर सोडण्यात आले होते.

Bird Flu
Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

संबंधित रूग्ण पोल्ट्रीं फार्ममधील कोंबड्यांच्या संपर्कात आला होता. पण त्याच्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीच्या बाबतीत गंभीर श्वसनाच्या समस्या समोर आलेली नाही. तर चौकशी वेळी लसीकरण आणि अँटीव्हायरल उपचारांच्या बाबतची माहिती देखील उपलब्ध झालेली नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. तसेच भारतात एच९एन२ विषाणूमुळे बर्ड फ्लूचा संसर्ग झालेले हे दुसरे प्रकरण असून याआधी अशा प्रकरणाची नोंद २०१९ मध्ये झाल्याचेही डब्ल्यूएचओचे सांगितले आहे.

Bird Flu
Bird Flu : राज्यात ‘बर्ड फ्लू’चा कोणताही धोका नाही

तर एच९एन२ व्हायरस विविध प्रदेशांमध्ये पोल्ट्रीमध्ये आढळणारा सर्वात प्रचलित एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्यामुळे सध्याच्या स्थिती एच९एन२ विषाणूमुळे हा संसर्ग रोग उद्भवतो. जो भयानक नाही. पण भविष्यात काही प्रमाणात अशा प्रकरणांची नोंद होऊ शकते असेही डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे.

काय आहे एच९एन२ व्हायरस?

एच९एन२ विषाणू पक्ष्यांमध्ये आढळतो. हा विषाणू सामान्यतः कोंबड्यांमध्ये आढळतो आणि त्याला बर्ड फ्लू असे म्हणतात. एच९एन२ हा इन्फ्लूएंझा विषाणूचा एक उपप्रकार आहे. जो आधी पक्षांमध्ये होतो आणि त्यानंतर तो मानवामध्ये संक्रमित होतो. एच९एन२ विषाणू श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. पण, मानवांमध्ये या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ असून तो फक्त पोल्ट्री फार्मच्या संपर्कात आल्याने होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com