Vijay Wadettiwar 
ॲग्रो विशेष

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांचे वाटोळं भाजपने केलं, वडेट्टीवार यांची खोचक टीका

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे रन तापत असून भाजपकडून काँग्रेसवर निशाना साधला जात आहे. तर काँग्रेसने शेतकऱ्यांचे नुकसान केले अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूर येथील सभेत केली होती.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पाच दौरे केले आहेत. यादरम्यान त्यांनी काँग्रेसने शेतकऱ्यांचे नुकसान केलं, असा दावा चंद्रपूर येथील सभेत केला. यावरून आता काँग्रेसने पलटवार केला आहे. भाजप झुटों की सरदार बनही असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर कर्जमाफीची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती का? असा सवाल केला आहे.

राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून सध्या प्रचाराच्या तोफा धडधडत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय महायुतीतील नेते प्रचरसभा घेत आहेत. तसेच इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधीसह महाविकास आघाडीचे नेते देखील मतदारापर्यंत पोहचत आहेत.

यादरम्यान मोदींनी चंद्रपुरच्या सभेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची जी अवस्था आहे. त्याला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली होती. तर काँग्रेसने शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे म्हटले होते.

यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपसह मोदींवर निशाना साधला आहे. तर भाजप खोटारड्यांची टीम असून महाराष्ट्राच्या गादीवर देखील खोटारडे बसले आहेत. आता निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीचे आश्वासन फडवणीस आणि भाजपवाले देत आहेत. पण यांनीच आम्ही कर्ज माफी देणार नाही असे प्रतिज्ञापत्र २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते, असे वडेट्टीवार म्हणाले.

देशातील शेतकरी कापूस पिकवतो त्यावेळी हे कापसाच्या गाठी आयात करतात. कांद्याचे उत्पादन चांगले होते. तेंव्हा कांदा निर्यात बंदी करतात. धान चांगले होते तेंव्हा तेव्हा निर्यात शुल्क लादता. सोयाबीन चांगले होते तेंव्हा तेल आयात करता आणि आता काँग्रेसवर आरोप करत आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे वाटोळे केल्याचा आरोप करत आहेत. आम्ही नाही तर महायुतीने भाजपने शेतकऱ्यांचे वाटळं केल्याचे वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कशावरून कर्जमाफीची घोषणा करत आहेत. यांनी मोदी, शाह यांच्याशी यावर चर्चा केली का? असा सवाल करताना भाजप आणि महायुतीची ही फक्त जुमलेबाजी असल्याचेही वडेट्टीवार यांनी दावा केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2026 : केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २२५ तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ

Amravati Farmers: अमरावतीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

SCROLL FOR NEXT