Rahul Gandhi in Parliament Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : अदानीसाठी शेतकऱ्यांचा, युवकांचा आंगठा कापला जातोय; राहुल गांधी यांचा संसदेत हल्लाबोल

Rahul Gandhi in Parliament Winter Session : आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत संविधानावरील चर्चा सुरू झाली. यावेळी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते यांनी भाजपवर शेतकरी आंदोलन, आणि युवकांवरून जोरदार टीका केली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर चर्चा सुरू आहे. यादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी (ता. १४) संविधानावर बोलताना भाजपवर जोरदार निशाना साधला. भाजपवाले फक्त अदानी आणि त्यांच्या सारख्या मोठ्या उद्योगपतींना फायदा देण्यासाठी द्रोणाचार्याप्रमाणे शेतकरी आणि युवकांचा अंगठा कापत चालले आहेत अशी टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान आपले मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी संविधान निर्मितीत महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर, पंडित नेहरू यांसारख्या नेत्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. तर संविधानात प्रतिबिंबित झालेले विचार आपली भारतीय संस्कृती आणि प्राचीन वारशातून प्रेरित असल्याचेही ते म्हणाले. तर प्राचीन वारशाशिवाय आपली राज्यघटना बनूच शकली नसती, असाही दावा त्यांनी केलाय.

यावेळी राहुल गांधी यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपल्याला संविधानात स्पष्टपणे दिसतो. त्यांच्या शिकवणीप्रमाणेच आम्हाला देश चालवायचा आहे. पण आज भाजपवाल्यांना देश द्रोणाचार्यांप्रमाणे चालवायचा आहे. गुरु द्रोणाचार्यांनी त्यांच्या एका शिष्याचा अंगठा गुरूदक्षिणा म्हणून अंगठा मागून घेतला. त्याचप्रमाणे भाजप आपल्या उद्योगपती मित्रांसाठी भारतातील युवकांचा आणि शेतकऱ्यांचा अंगठा कापत आहे.

देशातील युवकांकडे दुर्लक्ष केले जात असून भाजपला देशाची प्रतिभा आणि ताकद हिसकावून घ्यायची आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. तर शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत असून, त्यांच्या जागी उद्योगपतींचा फायदा केला जात आहे.

एक काळ असा होता की देशात युवक सकाळी लवकर उठून लष्कर भरती आणि इतर गोष्टींसाठी तयारी करत होता. पण आज पेपर लीक, लॅटरल एन्ट्री आणि अग्निवीर यांसारख्या योजनांद्वारे त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. तरुणांची मेहनत उद्ध्वस्त करण्यासाठी पेपरफुटीसारख्या घटना घडत असून अग्निवीर योजना आणून त्यांचे हक्क डावलले जात आहेत. कोणत्याही वर्गाची किंवा समूहाची मक्तेदारी असावी, असे राज्यघटनेत कुठेही लिहिलेले नाही. तर भाजपने ७० वेळा पेपर लिक केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. तर अशा प्रकारे देशातील तरुणांचा अंगठा कापला जावा, असे कुठेही लिहिलेले नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

तर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय संसदेत मांडताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील शेतकरी एमएसपीची मागणी करत आहे. पण त्यांच्या मागणीकडे लक्ष न देता लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा नळकांड्या फोडल्या जात आहेत. हे फक्त अदानीला फायदा देण्यासाठी भाजप करत आहे. तर भाजप आणि आरएसएस संविधानाच्या विरोधात जाऊन देशातील तरुण आणि शेतकऱ्यांचे शोषण करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT